Dussehra 2024 : 12 ऑक्टोबरच्या दिवशी म्हणजेच उद्या दसऱ्याचा (Dussehra 2024) सण साजरा केला जाणार आहे. दसरा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. दसऱ्याच्या दिवशी काही उपाय केल्यास तुमची आर्थिक स्थिती चांगली होऊ शकते, पैशांशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात. दसऱ्याच्या दिवशी हे काही उपाय केल्यास सर्व प्रकारच्या संकटातून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे. 


गुप्त दान करा 


दसऱ्याला संध्याकाळी लक्ष्मीची पूजा केल्यानंतर गुप्तपणे गरीब लोकांना दान केल्यास घरातील दारिद्र्य नाहीसं होतं. घरात गरिबी राहत नाही, तसेच आर्थिक लाभ मिळतो. गरिबांना गुप्तपणे अन्न, झाडू आणि कपडे दान केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घराची भरभराट होते.


अपराजिताची फुलं तिजोरीत ठेवा


दसऱ्याच्या दिवशी पूजा करताना लक्ष्मी देवीला अपराजिताची फुलं अर्पण करावी, यानंतर ही फुलं तिजोरीत किंवा पैशाच्या ठिकाणी, पैशाच्या पाकिटात ठेवा, असं केल्याने तिजोरी कधीच रिकामी राहत नाही. दसऱ्याच्या दिवशी चंद्राला अपराजिताची फुलं अर्पण केल्याने जीवनात सुख-शांती कायम राहते.


शस्त्र पूजन करा 


विजयादशमीला शस्त्रांची पूजा केल्याने सर्व कार्य सिद्धी होतात असे म्हणतात. विजयाचे वरदान मिळते. या दिवशी लोक वाहने, यंत्रे, वाद्ये, सर्व उपकरणे यांची पूजा करतात जे त्यांच्या दैनंदिन दिनचर्याचा भाग आहेत. त्यांची पूजा करून दसऱ्याला अर्पण केल्याने प्रगती होते असे मानले जाते.


दान करा 


दसऱ्याच्या दिवशी पिवळ्या कपड्यात नारळ गुंडाळून, मिठाई आणि पवित्र धागा राम मंदिरात दान केल्याने व्यवसायात फायदा होत असल्याचं मानलं जातं. असं केल्यास व्यवसाय दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट वाढतो, असंही मानलं जातं.


देवीची पूजा करा 


दसऱ्याच्या दिवशी अपराजिता देवीची पूजा केल्यास देखील प्रत्येक क्षेत्रात यश मिळतं. तुम्ही कोणत्याही कार्यात मागे पडत नाहीत.


मंत्राचा जप करा 


नोकरी आणि व्यवसायात ज्या व्यक्तीला अडचणी येत आहेत, त्याने दसऱ्याच्या दिवशी दुर्गा देवीची पूजा करावी. देवीला 10 फळं अर्पण करावी. फळं अर्पण करताना ओम विजयाय नमः या मंत्राचा जप करावा, यामुळे तुमच्या नोकरीबाबतच्या अडचणी दूर होतील.


हवन करा 


दसऱ्याच्या दिवशी हवन करण्याची परंपरा आहे. यासोबतच घरातील एखादा सदस्य दररोज आजारी पडत असल्यास दसऱ्याच्या दिवशी त्याच्या डोक्यावरुन एक नारळ 7 वेळा ओवाळावा आणि रावण दहनाच्या आगीत टाकावा. 


शमीचं झाड लावा 


दसऱ्याच्या दिवशी शमीचं झाड लावल्यास किंवा संध्याकाळी शमीच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यास शनीची साडेसाती कमी होऊ शकते.


नकारात्मक ऊर्जा निघून जाईल


दसऱ्याच्या दिवशी घराच्या ईशान्य कोपऱ्यात एका भांड्यात अपराजिताची फुलं ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहील. घरगुती त्रासातूनही सुटका होईल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :


Dussehra 2024 : विजयादशमीचा शुभ मुहूर्त नेमका कधी? वाचा पूजा पद्धत आणि या दिनाचं महत्त्व