Diwali 2025 Rajyog: धनत्रयोदशीपासून (Dhanteras 2025) अखेर दिवाळीला (Diwali 2025) सुरूवात झाली आहे. धनत्रयोदशीनंतर सोमवारी 20 ऑक्टोबरच्या दिवशी नरक चतुर्दशीचा (Narak Chaturdashi 2025) दिवस आहे. अशात दिवाळीत देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लोक विविध उपाय करत आहेत, मात्र यंदा 4 राशी अशा आहेत, ज्यांवर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपोआप मिळणार आहे. दिवाळीत कोणत्या भाग्यवान राशींना मोठा फायदा होऊ शकतो? जाणून घ्या. नरक चतुर्दशीला निर्माण होणाऱ्या 5 राजयोगामुळे कोणत्या भाग्यवान राशींना मोठा फायदा होऊ शकतो? जाणून घ्या.
दिवाळीत निर्माण होणाऱ्या 5 राजयोगामुळे कोणत्या राशी भाग्यवान असतील?
ज्योतिषशास्त्रानुसार, या वर्षी दिवाळीत ग्रह अशा शुभ स्थितीत आहेत की ते एक किंवा दोन नाही तर पाच राजयोग निर्माण करत आहेत. ज्याचा मोठा लाभ 5 राशींना होणार आहे.
दिवाळीत तब्बल 5 राजयोग
ज्योतिषशास्त्रानुसार, 2025 मध्ये, दिवाळीत शुक्रादित्य राजयोग, हंस महापुरुष राजयोग, नीचभंग राजयोग, नवपंचम राजयोग आणि कलात्मक राजयोग निर्माण होत आहेत. ज्योतिषशास्त्रात हे राजयोग अत्यंत शुभ मानले जातात. या राजयोगांमुळे, चार राशींच्या लोकांसाठी दिवाळी अत्यंत शुभ ठरू शकते.
कर्क (Cancer)
ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवाळीत कर्क राशीच्या लोकांना करिअरच्या सुवर्ण संधी मिळण्याची शक्यता आहे. बोनस, नोकरीत बढती आणि व्यवसायात नफा यामुळे तुमची दिवाळी खूप छान होईल. अनेक स्रोतांकडून पैसे मिळण्याची शक्यता आहे.
मिथुन (Gemini)
ज्योतिषशास्त्रानुसार, मिथुन राशीचे लोक तीक्ष्ण मनाचे, जिज्ञासू आणि मेहनती असतात. या दिवाळीत त्यांना नशीब मिळेल. दिवाळीनंतर तुम्हाला काही सुवर्ण संधी मिळण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे तुम्हाला पैसे कमविण्यास मदत होईल. कठीण काम पूर्ण होऊ शकते.
सिंह (Leo)
ज्योतिषशास्त्रानुसार, सिंह राशीचे लोक अत्यंत आत्मविश्वासू आणि नेतृत्वक्षम असतात. दिवाळीत निर्माण होणारे राजयोग संपत्ती आणि नवीन संधी आणतील. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुम्हाला पैसे आणि महागड्या भेटवस्तू मिळतील. समृद्धी वाढेल.
मीन (Pisces)
ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवाळीत मीन राशीच्या लोकांसाठी गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. आर्थिक स्थिरता मिळविण्यासाठी संघर्ष करणाऱ्यांना आता यश मिळू शकते. तुम्हाला पैशाची कमतरता भासणार नाही. नोकरीत असलेल्यांना बोनस आणि पगार वाढू शकतो. व्यवसायिकांनाही चांगले उत्पन्न मिळेल.
हेही वाचा :
Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनुसह 'या' 5 राशींची ऑक्टोबरच्या चौथ्या आठवड्यात चांदी! दिवाळीचा आठवडा 12 राशींसाठी कसा जाणार? साप्ताहिक राशीभविष्य वाचा
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)