Continues below advertisement

Diwali 2025 Muhurta: दिवाळीचा (Diwali 2025) सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या सणात येणाऱ्या विविध तिथी आणि मुहूर्ताबद्दल अनेकांच्या मनात गोंधळ निर्माण झाला आहे. खरं म्हणजे, दिवाळी ही वसुबारस (Vasu Baras 2025) ते भाऊबीज (Bhaubij 2025) पर्यंत साजरी केली जाते. या काळात देवी लक्ष्मी (Goddess Lakshmi) आणि कुबेर देवाची विशेष पूजा केली जाते. म्हणूनच त्याला रात्रीचा उत्सव असेही म्हणतात. दिवाळीच्या सणाची खरं तर प्रत्येकाला उत्सुकता आहे. हा उत्सव कोणत्या शुभ मुहूर्तावर साजरा केला पाहिजे? घरात सुख-समृद्धीसाठी कधी पूजा केली पाहिजे? वसुबारस ते लक्ष्मीपूजन पर्यंतचे मुहूर्त काय? या संदर्भात पंचांगकर्ते मोहन दाते (Mohan Date) यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया. 

दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे शुभ मुहूर्त (Diwali 2025 Shubh Muhurta)

  • वसुबारस - 17 ऑक्टोबर 2025 , शुक्रवार 
  • पूजा मुहूर्त 5:14 सकाळी ते 7:43 सायंकाळी
  • गुरु द्वादशी , धनत्रयोदशी, यमदीपदान - 18 ऑक्टोबर 2025 , शनिवार
  • नरक चतुर्दशी, अभ्यंग स्नान, यम तर्पण - 20 ऑक्टोबर 2025 , सोमवार
  • लक्ष्मी-कुबेर पूजन - 21 ऑक्टोबर 2025 , मंगळवार
  • लक्ष्मीपूजन मुहूर्त - 21 ऑक्टोबर 2025 , मंगळवार
  • दुपारी. 3 ते 4:30, सायं. 6 ते 8:40
  • वहीपूजन मुहूर्त - 22 ऑक्टोबर 2025, बुधवार
  • पहाटे 3:20 ते 6:00, सकाळी 11 ते 12:30, सायंकाळी 6:30 ते 8:00
  • यमद्वितीया (भाऊबीज) - 23 ऑक्टोबर 2025 , गुरुवार.

 

Continues below advertisement

आश्विन अमावस्या तिथी 2025

सुरुवात: 20 ऑक्टोबर 2025, दुपारी 3:44

समाप्ती: 21 ऑक्टोबर 2025, संध्याकाळी 5:54

क्ष्मी पूजा पद्धत

  • पूजेच्या ठिकाणी पाट अथवा चौरंग ठेवा
  • त्यावर लाल किंवा पिवळं कापड टाका.
  • लक्ष्मीची मूर्ती त्यावर ठेवा.
  • मूर्तीला स्नान घाला आणि जर फोटो असेल तर ते पूर्णपणे स्वच्छ करा.
  • धूप आणि दिवा लावा.
  • त्यानंतर, देवीच्या कपाळावर हळद, सिंदूर, चंदन आणि तांदूळ लावा.
  • त्यानंतर, हार आणि फुले अर्पण करा.
  • पूजेदरम्यान, अनामिका बोटाने धूप, चंदन, कुंकू, अबीर, गुलाल, हळद लावा.
  • त्यानंतर, नैवेद्य अर्पण करा.
  • यानंतर, देवीची आरती करा.
  • आरती आणि पूजा झाल्यानंतर, प्रसाद वाटप करा. 

हेही वाचा : 

Weekly Lucky Zodiac Signs: नवा आठवडा.. पैसा...इच्छापूर्ती...'या' 5 राशींचं नशीब घेऊन आला! सूर्य-गुरूचे संक्रमण राजासारखं जीवन देणार, तुमची रास?

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)