Diwali 2025: हिंदू धर्मात, देवी लक्ष्मीला (Goddess Lakshmi) धनाची देवी मानले जाते. असे मानले जाते की, ज्या व्यक्तीला किंवा घरात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो त्याला कधीही आर्थिक अडचणी येत नाहीत. आता दिवाळीचा (Diwali 2025) सण अवघ्या काही दिवसातंच येऊन ठेपलाय. दिवाळी सणात, समृद्धीची देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. कारण समृद्धीशिवाय सुख अशक्य आहे आणि ज्ञानाशिवाय समृद्धी अशक्य आहे. ज्योतिषशास्त्रानुसार (Astrology), दिवाळीच्या लक्ष्मी पूजनाच्या (Lakshmi Pujan 2025) दिवशी राशीनुसार पूजा केल्याने लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते, असे मानले जाते. तुमच्या राशीनुसार लक्ष्मी पूजन कसे करावे, याबाबत डॉ. भूषण ज्योतिर्विद यांनी काही विशिष्ट उपाय आणि पद्धती खालीलप्रमाणे दिल्या आहेत,
मेष (Aries)
ज्योतिषशास्त्रानुसार, यंदा लक्ष्मीपूजनाला गणपती आणि लक्ष्मीला लाल रंगाची फुले (गुलाब किंवा लाल कमळ) अर्पण करा
वृषभ (Taurus)
ज्योतिषशास्त्रानुसार, यंदा लक्ष्मीपूजनाला देवी लक्ष्मीला शुभ्र (पांढरी) वस्त्रे, पांढरी सुगंधी फुले (मोगरा/चंपा) अर्पण करा. नैवेद्यात दुधाची खीर अर्पण करणे शुभ राहील.
मिथुन (Gemini)
ज्योतिषशास्त्रानुसार, यंदा लक्ष्मीपूजनाला लक्ष्मीला हिरव्या रंगाची साडी अर्पण करावी गणेश ला मोदक द्यावेत
कर्क (Cancer)
ज्योतिषशास्त्रानुसार, यंदा लक्ष्मीपूजनाला पूजेत सुगंधी द्रव्ये (अत्तर/गुलाब जल) वापरा. श्रीयंत्राला स्थापित करावे . पांढऱ्या रंगाची मिठाई नैवद्य म्हणून द्यावेत
सिंह (Leo)
ज्योतिषशास्त्रानुसार, यंदा लक्ष्मीपूजनाला पूजेमध्ये झेंडूची फुले वापरा. पुरुष सूक्त आणि श्री सूक्ताचे पठण करा. नैवेद्यात पिवळी मिठाई द्या
कन्या (Virgo)
ज्योतिषशास्त्रानुसार, यंदा लक्ष्मीपूजनाला देवी लक्ष्मीसह भगवान विष्णूंची सुद्धा पूजा करा. गणपतीला तुळस अर्पण करा. देवीला हिरवी साडी आणि फळे अर्पण करा.
तूळ (Libra)
ज्योतिषशास्त्रानुसार, यंदा लक्ष्मीपूजनाला पांढरी फुले आणि गुग्गुळ धूप वापरून पूजा करा. गुलाब जल घरात शिंपडा नैवेद्यात खीर किंवा दूध अर्पण करा पंढरी साडी लक्ष्मी ला नेसवा
वृश्चिक (Scorpio)
ज्योतिषशास्त्रानुसार, यंदा लक्ष्मीपूजनाला लक्ष्मीला लाल फुले, चांदीचा कलश किंवा तांब्याचे भांडे अर्पण करा. पूजा करताना लाल वस्त्र लक्ष्मी माते ला द्यावे
धनु (Sagittarius)
ज्योतिषशास्त्रानुसार, यंदा लक्ष्मीपूजनाला लक्ष्मीच्या मूर्तीला हळद मिश्रित सुगंधी जलाने अभिषेक करा. पिवळी फुले आणि पिवळी मिठाई अर्पण करा. पिवळी साडी अर्पण करा
मकर (Capricorn)
देज्योतिषशास्त्रानुसार, यंदा लक्ष्मीपूजनाला देवीला निळ्या किंवा जांभळ्या रंगाची फुले अर्पण करा. पूजेच्या जागी राईच्या तेलाचा दिवा लावा. नैवेद्यात गुळाची मिठाई अर्पण करा
कुंभ (Aquarius)
ज्योतिषशास्त्रानुसार, यंदा लक्ष्मीपूजनाला केशर मिश्रित दुधाने लक्ष्मीला अभिषेक करा. बेसनची मिठाई अर्पण करा. पूजेमध्ये शक्य असल्यास पाटावर निळे फूल ठेवा , राखाडी रंग ची साडी अर्पण करा
मीन (Pisces)
ज्योतिषशास्त्रानुसार, यंदा लक्ष्मीपूजनाला पाच कमळगट्ट (कमळाचे बीज) अर्पण करा. देवीला पिवळी मिठाई अर्पण करा. शक्य असल्यास पाण्याच्या जवळ किंवा उत्तर-पूर्व दिशेला तुपाचा दिवा लावा.
पाच शक्तिशाली मंत्रा लक्ष्मी पूजनाच्या वेळेस उचारायचे
- ॐ ऐं क्लीं सौं
- ॐ श्रीं ह्रीं क्लीं महालक्ष्म्यै नमः'
- ॐ नमो भगवते वासुदेवाय
- ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः'
- ह्रीं श्रीं हिरण्यवर्णा लक्ष्मी देव्यै
हेही वाचा :
Dhanteras 2025: तब्बल 100 वर्षांनी धनत्रयोदशीला गुरू ग्रहाचा पॉवरफुल राजयोग! 'या' 3 राशींची पाचही बोटं तुपात असतील, पैसा दुप्पट मिळेल..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)