Horoscope Today, November 4, 2022 : आज कार्तिकी एकादशी आहे. सर्व तिथींमध्ये एकादशीच्या तिथीला विशेष महत्त्व असते. या दिवशी एकादशीचे व्रतही पाळले जाते. सर्व व्रतांमध्ये एकादशीचे व्रत हे श्रेष्ठ मानले जाते. हे व्रत भगवान विष्णूला समर्पित आहे. पंचांगानुसार 4 नोव्हेंबर ही कार्तिक शुक्ल एकादशी तिथी आहे. या एकादशीला देवूठाणी एकादशी असेही म्हणतात. आजच्या दिवशी तुमच्या राशीनुसार उपाय केल्यानं तुम्हाला जीवनात सुख, शांती आणि समृद्धी मिळू शकते. जाणून घेऊयात आजच्या दिवसाचे उपाय...
मेष
जर तुम्हाला तुमच्या जीवनात सौभाग्य आणि समृद्धी आाणायची असेल तर आजच्या एकादशीच्या दिवशी मेष राशीच्या लोकांनी तुळशीला लाल कापड अर्पण करावे. तसेच भगवान विष्णूला एक नारळ अर्पण करा.
वृषभ
या एकादशीच्या दिवशी जर तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळवायचे असेल, जीवनाच्या उंच स्थानी जायचे असेल तर आजच्या दिवशी भगवान विष्णूच्या मूर्तीची आणि तुळशीची पुजा करा. तसेच आज दान करा.
मिथुन
तुमचे जीवन सदैव आनंदी पाहायचे असेल तर आजच्या या एकादशीच्या दिवशी मिथुन राशीच्या लोकांनी पीठ भाजून, त्यात साखर घालून त्यात केळीचे तुकडे आणि तुळशीची पाने टाकून प्रसाद बनवावा. भगवान विष्णूची विधिवत पूजा करून त्यांना हा नैवेद्य दाखवावा. यानंतर उरलेला प्रसाद कुटुंबातील सर्व सदस्यांनी घ्यावा.
कर्क
नोकरीत चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर कर्क राशीच्या लोकांनी आज श्री विष्णूला हळदीचा गंध लाऊन पुजा करावी. पूजेनंतर हात जोडून देवाला प्रार्थना करावी.
सिंह
सिंह राशींच्या लग्न झालेल्या लोकांच्या जीवनात जर वैवाहिक काही समस्या येत असतील तर दोघांनी दक्षिणावर्ती शंखात पाणी भरुन भगवान विष्णूला अर्पण करावे. तसेच मंदिराच्या प्रांगणात किंवा कोणत्याही बागेत तुळशीचे रोप लावावे.
कन्या
जर तुम्हाला तुमच्या जीवनात पूर्ण ऊर्जा टिकवून ठेवायची असेल तर आज तुळशीच्या रोपाजवळ पिवळे कापड ठेवावे. तसेच तुळशीला साखरेचा प्रसाद द्यावा. त्यानंतर उरलेला प्रसाद कुटुंबातील सर्व सदस्यांना द्यावा. तिथे ठेवलेले पिवळे रंगाचे कापड दुसऱ्या दिवशी ब्राह्मणाला दान करावे.
तूळ राशी
तुमच्या मुलीच्या विवाहात काही अडचणी येत असतील तर त्या अडथळ्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी पाच तुळशीची पाने घ्यावीत आणि ती श्रीहरीला अर्पण करावी.
वृश्चिक
तुम्हाला तुमचा आवडता जीवनसाथी मिळवायचा असेल तर ओम नमो भगवते नारायण मंत्राचा जप करताना तुळशीच्या रोपाला केशर मिश्रित दूध अर्पण करा. तसेच भगवान विष्णूला केशर मिश्रित दूध अर्पण करावे.
धनु
तुमची आर्थिक सुख-समृद्धी वाढवायची असेल, आजच्या एकादशीच्या दिवशी तुळशीला बताशे अर्पण करा तसेच तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावावा. तसेच भगवान विष्णूची धूप-दीप, फुले इत्यादींनी पूजा करावी. पुजेच्या वेळी काही नाणी आणि शंख ठेवावे. पूजा संपल्यावर ती नाणी आणि शिंपले तिजोरीत ठेवा.
मकर
तुमचे वैवाहिक नाते आनंदी आणि मधुर बनवायचे असेल तर श्रृंगाराच्या वस्तू अर्पण करुन तुळशीच्या रोपाची पूजा करावी. तसेच पूजा केल्यानंतर सर्व वस्तू विवाहित स्त्रीला अर्पण कराव्यात.
कुंभ
तुमच्या जीवनात कोणत्याही प्रकारचे संकट येऊ नये, तुमचं जीवन कोणत्याही अडथळ्याशिवाय चालेल, यासाठी संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा लावावा. शक्य असल्यास गाईच्या तुपाचा दिवा लावावा. तुळशीला नमस्कार करुन तुमच्या उत्तम आयुष्यासाठी प्रार्थना करा.
मीन
तुमच्या मुलाचे वैवाहिक जीवन सुधारायचे असेल तर तुम्ही भगवान विष्णू आणि तुळशीची विधिवत पुजा करावी.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)