Colour Astrology : एखाद्या व्यक्तीच्या सवयी (Habits) त्याच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल (Personality) बरंच काही सांगू शकतात. याच प्रमाणे, तुमचा आवडता रंग (Favourite Colour) देखील तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल काही गोष्टी सांगू शकतो, हे तुम्हाला माहित आहे का? तर याबद्दलच आज जाणून घेऊया. तुमचा आवडचा रंग (Colour) तुमच्याबद्दल नेमकं काय सांगतो ते पाहूया.
लाल रंग (Red Colour)
ज्या लोकांना लाल रंग आवडतो त्यांना सर्वकाही नियंत्रणात ठेवणं आवडतं. हे लोक नातेसंबंध खूप चांगल्या पद्धतीने जपतात. याशिवाय, हे लोक त्यांच्या भावना अगदी सहजपणे व्यक्त करतात आणि कामाच्या ठिकाणी त्यांच्या जबाबदाऱ्याही चांगल्या प्रकारे पार पाडतात. लाल रंग आवडणारे लोक दृढनिश्चयी असतात, ते त्यांच्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करतात.
पिवळा रंग (Yellow Colour)
ज्या लोकांना पिवळा रंग आवडतो ते मजेदार आणि नेहमी आनंदी स्वभावचे असतात. या लोकांना आजूबाजूच्या लोकांशी बोलायला फार आवडतं, या गुणामुळे हे लोक पटकन मैत्री करतात. तसेच, ते कामाच्या ठिकाणी सर्जनशील असतात आणि त्यांचं काम फार नीटनेटकेपणाने करतात.
हिरवा रंग (Green Colour)
ज्या लोकांना हिरवा रंग आवडतो ते दूरदृष्टीचे आणि खूप बुद्धिमान मानले जातात. कोणताही निर्णय घेताना ते त्यांच्या मनापेक्षा त्यांच्या डोक्याचं ऐकणं पसंत करतात. हे लोक सर्व निर्णय भावनेच्या भरात न येता डोक्याने घेतात. त्यांना सतत काही ना काही शिकत राहायला आवडतं आणि ते प्रेमळ स्वभावाचे असतात.
निळा रंग (Blue Colour)
अनेकांना निळा रंग आवडतो. असे लोक नाती जपण्याला महत्त्व देतात, कुटुंबातील एकोप्याला महत्त्व देतात. ते स्वभावाने रोमँटिक असतात आणि जोडीदारासोबतचं नातं खूप चांगलं जपतात. हे लोक स्पर्धेपेक्षा चांगल्या पद्धतीने काम करण्याच्या शैलीला प्रोत्साहन देतात. हे लोक कोणताही निर्णय भावनेच्या जोरावर येऊन घेतात.
जांभळा रंग (Purple Colour)
ज्या लोकांना जांभळा रंग आवडतो त्यांना इतर लोकांचे विचार आणि मतं ऐकायला आवडतात. स्वभावाने ते हुशार आणि मजेदार असतात. त्यांना लोकांना सल्ला द्यायला आवडतं. हे लोक स्वतंत्र जीवन जगतात, त्यांना कुणाच्याही बंधनात राहणं आवडत नाही. नवीन शैली, नवीन ट्रेंड्स आत्मसात करण्याचा गुण त्यांच्यात असतो.
गुलाबी रंग (Pink Colour)
अनेकांना गुलाबी रंगही आवडतो. गुलाबी रंग आवडणारे लोक स्वभावाने प्रेमळ, दयाळू असतात. त्यांचं व्यक्तिमत्व आकर्षक असून ते भावनिक देखील असतात. या लोकांना त्यांचं वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन संतुलित ठेवायला आवडतं. त्यांचं व्यक्तिमत्व स्वतंत्र आणि उत्साही असतं.
काळा रंग (Black Colour)
अनेकांना काळा रंगही आवडतो. हे लोक स्वत:वर जास्त प्रेम करतात. त्यांना नेहमी हुशारकी मारायला आवडते, त्यांना स्वतःला सर्वात शक्तिशाली दाखवायचं असतं. हे लोक दृढनिश्चयी आणि आत्मविश्वासू असतात. तसेच, हे लोक धोका पत्करण्यास घाबरत नाहीत. कामाच्या ठिकाणी त्यांची कामगिरी चांगली असते.
पांढरा रंग (White Colour)
या लोकांना शांतता आवडते आणि त्यांच्या सभोवतालच्या लोकांकडून देखील ते शांतीची अपेक्षा करतात. त्यांना काहीही विचार करून बोलायला आवडतं. ते दयाळू असतात आणि लोकांना मदत करण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतात, जरी ती व्यक्ती अनोळखी असली तरीही तिला ते तत्परतेने मदत करतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :