Chocolate Day 2023 Astrology : व्हॅलेंटाईन वीकचा (Valentine Week) तिसरा दिवस चॉकलेट डे (Chocolate Day 2023) म्हणून साजरा केला जातो. आज 9 फेब्रुवारी रोजी प्रेमात असणारे जोडपे एकमेकांसोबत चॉकलेटच्या गोडव्याची देवाणघेवाण करतात. जर तुम्हालाही प्रेमाला शेवटपर्यंत कायम ठेवायचे असेल, तर चॉकलेट डेच्या दिवशी तुमच्या जोडीदाराचे तोंड चॉकलेटने गोड करा. पण चॉकलेटचा इतिहास जाणून घेतल्यास त्याची सुरुवात कडूपणापासून झाल्याचे लक्षात येईल. त्याचप्रमाणे तुमच्या प्रेमाचा गोडव्याचे रुपांतरण द्वेषात होऊ देऊ नका. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून जाणून घेऊया, कोणत्या राशीच्या लोकांना चॉकलेट गिफ्ट करून त्यांचे प्रेम वाढवता येईल? तर कोणासाठी त्याचे परिणाम उलट होऊ शकतात. 


 


या राशीचे लोक असतात गोडचे शौकीन



-मेष, कन्या, तूळ आणि मीन राशीचे लोक गोडचे शौकीन असतात. मिठाई त्यांना खूप आवडते.


-वृश्चिक, धनु, मकर आणि कर्क राशीला चॉकलेट सोबत काहीतरी चटपटीत द्या. प्रेम वाढेल.


-कुंभ राशीला हॉट चॉकलेट द्या, त्यांचा मूड चांगला होईल.  


-चॉकलेट्स आणि स्ट्रॉबेरी वृषभ राशीच्या लोकांना आवडतात. त्यांचे मन जिंकण्यासाठी एखादा परफ्यूमही दिला जाऊ शकतो.


-मिथुन राशीचे लोक खुले स्वभावाचे असतात आणि त्यांना ब्लॅक चॉकलेट ऐवजी व्हाईट चॉकलेट दिले जाऊ शकते.


-कर्क राशीचे लोक काहीसे लाजाळू स्वभावाचे असतात. ज्यामुळे त्यांना सिल्क चॉकलेट दिले जाऊ शकते. 


-सिंह राशीचे लोक रोमँटिक स्वभावाचे असतात. त्यांना प्रेमाच्या गोड स्पर्शासह चॉकलेट्स भेट द्या.



जन्म पत्रिकेतील अशुभ ग्रहामुळे उद्भवतात समस्या 
मुलाच्या जन्मावेळी, लग्न, आणि इतर आनंदाच्या प्रसंगी, नातेवाईकांचे तोंड गोड करण्यासाठी मिठाई वाटली जाते, जेणेकरून आनंद वाढेल, परंतु काही लोकांना हा गोडवा अजिबात आवडत नाही. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून समजून घेतल्यास, आपल्या जन्म राशीमध्ये आणि त्याच्या नक्षत्रांमध्ये काही अशुभ ग्रह आहेत. जे अनेक प्रकारच्या समस्या निर्माण करतात, त्यामुळे त्यांची जन्म राशी आणि नक्षत्र जाणून घेऊन मिठाई वाटण्यात थोडा संकोच बाळगला पाहिजे, परंतु एखाद्याच्या राशीमध्ये काही चांगले ग्रह किंवा नक्षत्र असतील तर. त्यांना अवश्य गोड आवडेल


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


इतर बातम्या


Zodiac Style: तुमच्या राशीनुसार 'या' रंगाचे कपडे परिधान करा, प्रत्येक कामात यश मिळेल, ज्योतिषशास्त्रात म्हटलंय...