Chaturgrahi Yog 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, मार्च (March 2026) महिन्याचा तिसरा आठवडा ग्रहांच्या दृष्टीने फार महत्त्वाचा असणार आहे. याचं कारण म्हणजे 18 मार्च 2026 रोजी गुरुच्या राशीत म्हणजेच मीन राशीत चतुर्ग्रही योग निर्माण होणार आहे. यामुळे तीन राशींच्या लोकांचे नशिबाचे दार उघडतील. 

गुरुच्या राशीत 18 मार्च 2026 रोजी 4 ग्रहांचा शुभ योग निर्माण होणार आहे. यामध्ये शनि, चंद्र, सूर्य आणि शुक्र अशा ग्रहांचा योग निर्माण होणार आहे. हा योग 21 मार्च 2026 पर्यंत प्रभावी असणार आहे. त्यानंतर चंद्र मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे तीन राशींना चांगला लाभ मिळेल. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी चतुर्ग्रही योग फार चांगला ठरणार आहे. या काळात तुम्हाला धनलाभाच्या अनेक संधी मिळतील. तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ झालेली दिसेल. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. नवीन ओळखी निर्माण होतील. या कालावधीत तुम्हाला मित्रांचा देखील चांगला सपोर्ट मिळेल. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीचा स्वामी ग्रह गुरु आहे. चतुर्ग्रही योग गुरुच्या राशीत निर्माण होणार आहे. यामुळे तुम्हाला चांगला अनुभव तर मिळेलच. त्याचबरोबर करिअरमध्ये देखील चांगली प्रगती पाहायला मिळेल. या काळात तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले पैसे तुम्हाला मिळतील. तसेच, पैशांचा जपून वापर करा. या कालावधीत तुम्ही तुमच्या नवीन व्यवसायाची सुरुवात करु शकता. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीत हा चतुर्ग्रही योग निर्माण होणार आहे. यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वात चांगला बदल दिसून येईल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना कामात प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. तसेच, तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागेल. मात्र, हा प्रवास तुमच्यासाठी लाभदायी ठरेल. 

हे ही वाचा :                                       

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Shukra Gochar 2026 : अवघ्या काही तासांतच शुक्राचा रेवती नक्षत्रात प्रवेश; 15 मार्चपासून पुढचे 11 दिवस 'या' राशी जगतील ऐटीत, काऊंटडाऊन सुरु...