Chandra Grahan 2026 : 2026 वर्षाचं दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण (Chandra Grahan 2026) 28 ऑगस्ट 2026 रोजी शुक्रवारच्या दिवशी लागणार आहे. खगोलशास्त्राबरोबरच ज्योतिष शास्त्रात देखील ही घटना फार महत्त्वाची मानली जाते. मान्यतेनुसार, ग्रहण काळात ब्रह्मांडात नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो. ज्याचा थेट परिणाम ग्रह-नक्षत्रांबरोबरच व्यक्तीच्या जीवनावरही पडतो. त्यामुळे ग्रहण काळात थोडासा जरी निष्काळजीपणा केला तरी त्याचं अशुभ फळ मिळतं. 

Continues below advertisement

28 ऑगस्ट रोजी लागणार वर्षाचं शेवटचं चंद्रग्रहण 

2026 वर्षाचं दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण 28 ऑगस्ट रोजी लागणार आहे. हे आंशिक चंद्रग्रहण असणार आहे. भारतीय वेळेनुसार, आंशिक अवस्था सकाळी 8 वाजून 4 मिनिटांनी सुरु होणार होऊन 11 वाजून 21 मिनिटांपर्यंत असणार आहे. मात्र, हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे भारतात सूतक काळ लागू होणार नाही. 

ग्रहण काळात चुकूनही हे काम करु नका...

पूजा-पाठशी संबंधित 'हे' कार्य करु नका

धार्मिक मान्यतेनुसार, ग्रहण काळात मंदिराचं कपाट बंद ठेवण्याची तसेच, सामान्य पूजा-पाठ न करण्याची परंपरा आहे. या दरम्यान नवीन पूजा किंवा एखादं धार्मिक कार्य सुरु न करण्याचा सल्ला दिला जातो. 

Continues below advertisement

शुभ कार्य करणं टाळा 

ग्रहण काळात कोणतंही नवीन किंवा शुभ कार्य सुरु न करण्याचा सल्ला दिला जातो. मान्यतेनुसार, या काळात शुभ कार्य करण्याऐवजी ध्यान, मंत्र जाप तसेच, देवाचं स्मरण करणं शुभकारक मानलं जातं. जर तुम्हाला महत्त्वाचं शुभ कार्य करायचं असेल तर ग्रहणकाळानंतर केल्यास ते योग्य मानलं जाईल. 

आहाराबाबत सतर्कता बाळगा 

धार्मिक परंपरेत ग्रहण काळात आहार बनवण्याच्या पद्धतीनुसार देखील काही नियम सांगण्यात आले आहेत. मान्यतेनुसार, ग्रहण सुरु होण्याआधी भोजन करावं. ग्रहण काळात अन्नग्रहण करु नये. तसेच, लहान मुलं, ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिला किंवा एखाद्या आजाराने त्रस्त असणाऱ्या लोकांनी आपल्या आरोग्यानुसार भोजन किंवा औषधं घ्यावीत. 

नकारात्मक विचारांपासून दूर राहा 

चंद्रग्रहण काळात मनाला शांत ठेवण्याचा सल्ला दिला जातो. या दरम्यान एखाद्याशी वादविवाद करणं, राग करणं किंवा तणाव वाढवणाऱ्या गोष्टी न करण्याचा सल्ला दिला जातो. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या इतर बातम्या :           

Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधनाच्या दिवशी जुळून येणार 3 शुभ योग; भावाला राखी बांधल्यास उजळणार भाग्य, फक्त 'ही' चूक टाळा...