Chandra Grahan 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, 3 मार्च 2026 रोजी म्हणजेच आज संध्याकाळी आकाशात खगोलीय दृश्य पाहायला मिळणार आहे. ते म्हणजे आज पूर्ण चंद्रग्रहण (Chandra Grahan)आहे. पण त्याचबरोबर आज चंद्र लाल रंगाचा दिसमार आहे. यालाच 'ब्लड मून' असेही म्हणतात. जेव्हा पृथ्वी, सूर्य आणि चंद्र एकमेकांच्या जवळ येतात तेव्हा त्याची सावली चंद्रावर पडते. याच कारणामुळे चंद्राचा रंग तांबूस लाल रंगाचा दिसतो. 

Continues below advertisement

ज्योतिष शास्त्रात सांगितल्याप्रमाणे, हे चंद्रग्रहण व्यक्तीच्या मनावर तसेच, भावनांवर परिणाम करते. या दरम्यान आपण जास्त विचार करु लागतो. तसेच, स्वत:वर दबाव भासू लागतो. प्रत्येक गोष्टीला आपण परफेक्ट बनविण्याचा प्रयत्न करतो. या काळात मानसिक तणावही वाढतो. त्यामुळे या काळात शांत राहणं गरजेचं आहे. 

हे चंद्रग्रहण सिंह राशीत लागणार आहे. त्यामुळे आजच्या ब्लड मूनचा परिणाम कोणकोणत्या राशींवर पाहायला मिळणार आहे ते जाणून घेऊयात. 

Continues below advertisement

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांना आज आपल्या विचारात आणि बोलण्यात काहीसा बदल दिसून येईल. या दरम्यान तुम्ही काही गोष्टींचा अधिक गांभीर्याने विचार कराल. तसेच, नात्यात संवाद साधण्याची पद्धत बदलू शकते. यामुळे काही नाती जवळ तर काही नाती दूर होऊ शकतात. नवीन गोष्टी तुम्हाला खूप काही शिकवतील. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ आत्मचिंतनाचा असणार आहे. या काळात तुम्ही स्वत:बद्दल अधिक विचार कराल. तुमच्या जीवनात तुम्ही काही महत्त्वाचे निर्णय घ्याल. तसेच, भविष्याच्या संबंधित तुम्ही काही महत्त्वाच्या योजना राबवाल. तसेच, या कालावधीत तुमचा व्यवसायिक दृष्टीकोन बदलेल. मित्रांबरोबर नवीन नाती निर्माण होतील. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीसाठी लोकांसाठी हा काळ आव्हानात्मक असणार आहे. या कालावधीत नात्यांना एका वेगळ्या दृष्टीने तुम्ही पाहण्याचा प्रयत्न कराल. जुन्या गोष्टी आठवून तुम्हाला त्रास होऊ शकतो. तसेच, तुमच्या मित्रांबरोबर देखील नवीन विचार तुमच्या मनात रुजू होतील. 

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ महत्त्वाचा असणार आहे. या काळात आध्यात्मिक दृष्टीकोन तुमचा अधिक जागृत होईल. तुमच्या अंतर्मनातील आवाजाला तुम्ही ओळखाल. तसेच, भावनात्मक संतुलन राहील. मानसिक शांतीसाठी तुम्ही वेगवेगळे प्रयत्न कराल. 

हे ही वाचा :                               

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Shani Ast 2026 : पैसा, संपत्ती आणि श्रीमंती...शनिच्या मीन राशीत अस्ताने पुढचे 76 दिवस 'या' राशी जगतील ऐटीत, राजासारखा असणार यांचा थाट