Chandra Grahan 2026: नुकतंच 12 ऑगस्ट रोजी सूर्यग्रहण पार पडले. याच दिवशी आषाढ अमावस्या देखील होती. त्यामुळे विविध धार्मिक विधी कधी करायचे? असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित झाले. आणि आता याच सूर्यग्रहणानंतर थेट रक्षाबंधन सणाच्या दिवशी चंद्रग्रहण होत आहे, ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सूर्यग्रहणानंतर काही दिवसांनी, 28 ऑगस्ट रोजी खंडग्रास चंद्रग्रहण होणार आहे. या चंद्रग्रहणाची वेळ, कधी सुरू होणार? सूतक काळ वैध असेल का? आणि त्यासंबंधित महत्त्वाच्या गोष्टींबद्दल जाणून घेऊया.
ऑगस्टमध्ये सूर्यग्रहणानंतर लगेच चंद्रग्रहण होणार...अन् पौर्णिमाही...(Chandra Grahan 2026)
ऑगस्ट 2026 महिना हा खगोलशास्त्रीय घटनांसाठी एक अतिशय विशेष महिना मानला जातो. या महिन्यात सूर्यग्रहणानंतर चंद्रग्रहणही होणार आहे. वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण 12 ऑगस्ट रोजी होईल, तर काही दिवसांनंतर 28 ऑगस्ट रोजी खंडग्रास चंद्रग्रहण होईल. विशेष म्हणजे, हे ग्रहण रक्षाबंधन आणि श्रावण पौर्णिमेच्या दिवशी होणार आहे. ग्रहणाच्या वेळी चंद्र कुंभ राशीत असेल. या चंद्रग्रहणाची वेळ, दृश्यमानता आणि त्यासंबंधित महत्त्वाच्या गोष्टींबद्दल जाणून घेऊया.
2026 मध्ये चंद्रग्रहण कधी होणार आहे?
हिंदू दिनदर्शिकेनुसार, 2026 मधील शेवटचे चंद्रग्रहण 28 ऑगस्ट रोजी सकाळी 8:04 वाजता सुरू होईल आणि सकाळी 11:22 पर्यंत चालेल. हे एक खंडग्रास चंद्रग्रहण असेल. पंचांगानुसार, हे ग्रहण श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला होईल, म्हणजेच ज्या दिवशी रक्षाबंधन हा सण देखील साजरा केला जाईल.
हे चंद्रग्रहण भारतात दिसेल का? सूतक काळ लागू होईल का?
ज्योतिषींच्या मते, 28 ऑगस्ट रोजी होणारे हे चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. ते प्रामुख्याने उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप आणि आफ्रिकेच्या अनेक भागांमध्ये दिसेल. भारतात ग्रहण दिसणार नसल्यामुळे, त्याच्याशी संबंधित धार्मिक श्रद्धेनुसार सूतक काळ येथे लागू होणार नाही.
पूजा किंवा शुभ कार्यांशी संबंधित निर्बंध असतील का?
ज्योतिषींच्या मते, साधारणपणे चंद्रग्रहणाच्या सुमारे 9 तास आधी सुतक काळ सुरू होतो असे मानले जाते. जेव्हा एखाद्या ठिकाणी ग्रहण दिसत नाही, तेव्हा तिथे सुतकाच्या धार्मिक श्रद्धा लागू होत नाहीत. त्यामुळे, भारतात या चंद्रग्रहणादरम्यान पूजा किंवा शुभ कार्यांशी संबंधित कोणतेही निर्बंध असणार नाहीत.
हेही वाचा :
Shravan 2026: प्रतिक्षा संपली, श्रावण मास सुरू! आज पहिलाच श्रावणी गुरूवार विशेष, 5 राशींचं भाग्य फळफळलं, बुधादित्य राजयोगासह अनेक योग जुळले, महत्त्व, भाग्यशाली राशी...
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
