Chandra Grahan 2023: चंद्रग्रहण (Chandra Grahan) ही भौगोलिक घटना मानली जाते. वर्षातील पहिलं चंद्रग्रहण 05 मे, शुक्रवारी दिसणार आहे. हे चंद्रग्रहण खूप खास असणार आहे, कारण यंदा चंद्रग्रहण बुद्ध पौर्णिमेला दिसणार आहे. हा योगायोग 139 वर्षांनंतर जुळून आला आहे.  


वर्षातील पहिले चंद्रग्रहण 05 मे, शुक्रवारी होणार आहे. बुद्ध पौर्णिमाही याच दिवशी आहे. तूळ राशीत आणि स्वाती नक्षत्रात चंद्रग्रहण होईल. हे चंद्रग्रहण रात्री 8.44 ते मध्यरात्री 1.02 पर्यंत राहील. या चंद्रग्रहणाचा कालावधी सुमारे 4 तास 15 मिनिटं असेल. चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी 9 तासांपूर्वी सुरू होतो, परंतु वर्षातील पहिले चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे त्याचा सुतक कालावधी येथे वैध राहणार नाही, हे एक पेनम्ब्रल चंद्रग्रहण आहे, म्हणजेच या कारणामुळे पृथ्वीची सावली चंद्रावर फक्त एका बाजूला राहते, ग्रहण सर्वत्र दिसणार नाही. 2023 सालचे पहिले चंद्रग्रहण कोणत्या राशीसाठी शुभ असणार आहे ते जाणून घेऊया.


'या' 3 राशींसाठी चंद्रग्रहण शुभ


मिथुन (Gemini)


मिथुन राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण शुभ ठरणार आहे. मिथुन राशीच्या लोकांना कुटुंबात काही चांगली बातमी ऐकायला मिळेल, पण घाई टाळावी लागेल. आर्थिक बाजू भक्कम होण्यास मदत होईल. तसेच, या दिवशी मिथुन राशीच्या लोकांचे मतभेद होऊ शकतात, त्यामुळे शांततेनं काम पूर्ण करावं. 


सिंह (Leo)


सिंह राशीच्या लोकांसाठी चंद्रग्रहण अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. या राशीची लोक कोणतंही काम करतील त्यात त्यांना यश मिळेल. सिंह राशीच्या लोकांना आर्थिक फायदाही होईल. तसेच, आनंदवार्ताही ऐकायला मिळेल. जर कुटुंबात कलह असतील तर ते दूर सारून पुन्हा एकत्र येण्याची संधी या राशीच्या लोकांना मिळू शकते. योग्य पद्धतीनं मेहनत घेतली तर सिंह राशीच्या लोकांच्या पायापाशी यश लोळण घेईल.  


मकर (Capricorn)


मकर राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुमचे अडकलेले पैसे तात्काळ तुम्हाला मिळतील. कोट्याधीश होण्याचं स्वप्न उराशी बाळगून असाल तर, चंद्रग्रहण तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. कोट्याधीश होण्याची संधी तुमच्याकडे आहे. मेहनत केल्यानं तुम्हाला नक्कीच यश मिळेल. तुम्ही मेहनत व्यर्थ जाणार नाही. या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल. दीर्घकाळापासून नोकरीच्या शोधात असलेल्यांना नक्कीच यश मिळेल.


कन्या (Virgo)


चंद्रग्रहणाच्या प्रभावामुळे कन्या राशीच्या लोकांच्या आयुष्यातील सर्व समस्या, दुःख दूर होतील. व्यवसायात मोठा फायदा होईल. करिअरमध्ये फायदेशीर बदल दिसून येतील. नव्या मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सर्वांचं आरोग्य उत्तम राहील. नोकरदारांना प्रमोशन मिळू शकतं.


कुठे दिसणार हे चंद्रग्रहण? (Chandra Grahan 2023 where to watch) 


वर्षातील पहिलं चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. हे चंद्रग्रहण युरोप, मध्य आशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, अटलांटिक, हिंदी महासागर आणि अंटार्टिका यांसारख्या भागांत दिसणार आहे. यासोबतच या चंद्रग्रहणाचा कालावधी रात्री 8:44 ते मध्यरात्री 1:02 पर्यंत असेल.