Chanakya Niti : महिलांच्या 'या' टिप्पीकल सवयींमुळे घराचं होतं वाट्टोळं; लक्ष्मीही होते नाराज, चाणक्य सांगतात...
Chanakya Niti : चाणक्य नीतीमध्ये, आचार्य चाणाक्य यांनी काही महिलांच्या वाईट सवयींविषयी सांगितलं आहे. ज्याच्यामुळे घरात संकटं येऊ शकतात.

Chanakya Niti : आपल्या कुटुंबात सुख-शांती राहावी, समाजात मान-सन्मान मिळावा यासाठी घरातील प्रत्येक व्यक्तीचं योगदान असणं गरजेचं आहे. घरातील एक व्यक्ती जरी चुकला तरी त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो. यामुळे घरातील मान-सन्मान, धन-संपत्ती नष्ट होते. विशेषत: घरातील स्त्रीचा घरात वावर कसा असतो. त्यांच्या कोणत्या सवयी असतात या सगळ्या गोष्टी फार महत्त्वाच्या असतात.
चाणक्य नीतीमध्ये, आचार्य चाणाक्य यांनी अशाच काही महिलांच्या वाईट सवयींविषयी सांगितलं आहे. ज्याच्यामुळे घरात संकटं येऊ शकतात. त्याचबरोबर त्यांनी महिलांना काही सवयींपासून दूर राहण्याचा सल्ला देखील दिला आहे. या सवयी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
विनाकारण खर्च
विनाकारण पैसे खर्च केल्याने श्रीमंत माणूसही गरीब होऊ शकतो. घरातील कर्त्या स्त्रीची जर पैसे खर्च करण्याची सवय असेल तर घरात कधीच पैसे टिकत नाहीत. घरात पैशांची बचत होत नाही.
एखाद्याविषयी वाईट बोलण्याची सवय
ज्या स्त्रीमध्ये लोकांविषयी वाईट बोलण्याची सवय असते अशा घराची कधीच बरकत होत नाही. तसेच, समाजात त्यांचा मान-सन्मान देखील कमी होतो. घरात वादविवाद वाढतात. नातेसंबंध तुटतात. तसेच, घरात सुख-शांती राहात नाही.
घमंड/अहंकार
एखाद्या गोष्टीविषयी अहंकार बाळगणं फार चुकीचं आहे. यामुळे अनेकांच्या आयुष्याचं नुकसान होतं. अशात जर घरातील स्त्री घमंडी असेल तर त्याचा परिणाम संपूर्ण घरावर होतो. ही वाईट सवय तुमच्या वैवाहिक नात्यात दुरावा निर्माण करु शकते.
भांडखोर
भांडखोर व्यक्ती कधी स्वत: खुश राहात नाहीत ना कधी दुसऱ्यांना खुश ठेवत. त्यामुळे जर घरातील महिलाच भांडखोर असेल तर घरात नेहमी नकारात्मक वातावरण राहतं. समाजात मान-सन्मान कमी होतो. तसेच, घराला बरकत येत नाही.
हेही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















