Chanakya Niti : चुकूनही 'या' लोकांना मदत करु नका, अन्यथा...आयुष्यभर होईल पश्चात्ताप, चाणाक्य सांगतात...
Chanakya Niti : आयुष्यात खरी आणि प्रामाणिक माणसं कशी ओळखायची? कधी आणि कोणाला मदत करायची? या संदर्भात चाणाक्यांनी सांगितलं आहे.

Chanakya Niti : आचार्य चाणाक्य हे एक महान विचारक, अर्थशास्त्रज्ञ आणि रणनितीकार होते. त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट आजही समाजात लागू होते. त्यांनी चाणक्य निती नावाचा ग्रंथ लिहिला. यामध्ये त्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टींवर आपलं मत मांडलं आहे. तसेच, आयुष्यात खरी आणि प्रामाणिक माणसं कशी ओळखायची? कधी आणि कोणाला मदत करायची? या संदर्भात सांगितलं आहे.
या ठिकाणी आचार्य चाणाक्य यांनी कोणाची मदत करु नये या संदर्भात सांगितलं आहे ते जाणून घेऊयात.
जे तुमच्या मदतीला विसरून जातील
चाणाक्यांच्या म्हणण्यांनुसार, जे लोक तुमची मदत घेतल्यानंतर पण तुमचा आदर करत नसतील, तुम्हाला विसरत असतील तर अशा लोकांना वारंवार मद करु नये.
आळशी लोक
जे लोक स्वत: मेहनत करत नाहीत आणि नेहमी दुसऱ्यांवरच अवलंबून असतात. अशा लोकांना अजिबात मदत करु नये. चाणक्यांनुसार, ज्या लोकांना स्वत: काही करायचं आहे फक्त अशा लोकांनाच मदत करावी.
गद्दार आणि कपटी लोक
चाणक्यांनुसार, जे लोक दुसऱ्यांना धोका देतात. त्रास देतात. खोटं बोलतात किंवा चलाखीने आपल्या फायद्याचं काम काढून घेतात अशा लोकांना मदत करणं म्हणजे स्वत:साठी खड्डा खोदण्यासारखं आहे. हे लोक कोणाचेच नसते.
जे वेळोवेळी तक्रारी करतात
चाणाक्यांच्या मते, काही लोक नेहमी आपल्या गरिबीची, परिस्थितीची तक्रार करतात. मात्र, कधीच समाधान मानत नाहीत. त्यांना वारंवार समजावल्याने किंवा मदत केल्याने कोणताच त्यांच्यावर फरक पडत नसेल. तर अशा लोकांपासून वेळीच लांब राहा. कारण अशा लोकांना फक्त सहानुभूती हवी असते समाधान नाही. त्यामुळे अशा लोकांपासून दूरच राहा.
जे तुमच्या पाठीमागे वाईट बोलतात
चाणक्यांच्या म्हणण्यानुसार, जर एखादी व्यक्ती तुमच्यासमोर चांगला व्यवहार करत असेल पण तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल वाईट बोलत असेल तर अशा लोकांवर विश्वास ठेवण्याची चूक करु नका.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















