Chanakya Niti : आचार्य चाणाक्य यांना इतिहासातील सर्वात मोठे कूटनीतितज्ज्ञ, इतिहासकार आणि बुद्धिमान व्यक्तीच्या नावाने ओळखले जातात. चाणाक्यांची निती व्यक्तीला सरळ मार्गावर नेते. व्यक्तीला प्रत्येक वेळी यश मिळविण्यास मदत करते. प्रत्येक समस्येवर उपाय शोधण्याची त्यांची हातोटी होती. मानवी जीवनाच्या कल्याणासाठी त्यांनी चाणक्य नीती शास्त्राचा शोध लावला. आजवर आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांनी जीवनाचा मार्ग सुकर करण्यासाठी अनेक मार्ग सांगितले. 


आपल्या आयुष्यात असं अनेकदा घडते की, अनेक वेळा प्रयत्न करून देखील आपल्याला यश मिळत नाही. त्यांच्याकडून अशा काही चुका होतात की ज्यामुळे त्यांना हार मानावी लागते. याचं कारण माणसांच्याच काही चुका आहेत. आचार्य चाणाक्य यांच्या म्हणण्यानुसार, जर एखाद्या व्यक्तीला यश मिळवायचं असेल तर अशा वेळी काही गोष्टी अशा आहेत ज्या त्याने दुसऱ्यांशी कधीच शेअर करू नयेत. इतरांना या गोष्टी शेअर केल्याने व्यक्तीला आयुष्यात कधीच यश मिळत नाही. तर, अशा गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. 


आपलं ध्येय


आचार्य चाणक्यांच्या मते, व्यक्तीला यश संपादन करण्यासाठी एक निश्चित ध्येय ठरवणं फार गरजेचं आहे. पण तेच जर तुम्ही इतरांना सांगितलंत तर त्यामुळे तुमच्या मार्गात अपयश येऊ शकतं. जर तुम्हाला जीवनात यश मिळवायचं असेल तर तुमच्या ध्येयाविषयी कोणलाच सांगू नका. तुमच्या मित्रांना तर सोडूनच द्या पण कुटुंबियांना देखील सांगू नका. पण तुमचं ध्येय गाठण्यासाठी सतत प्रयत्नशील राहा. 


तुमची कमजोरी ओळखा 


आचार्य चाणक्यनुसार, व्यक्तीला जर यश मिळवायचं असेल तर तुमच्यातला कमीपणा कोणालाच सांगू नका. जर तुम्ही तुमच्यात ज्या गोष्टींची कमतरता आहे अशा गोष्टी जर इतरांना सांगितल्या तर लोक त्याचा फायदा घेतील. यामुळे तुमच्या विकासात अडथळा येईल. 


तुमची कौशल्ये ओळखा 


आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यांनुसार, व्यक्तीला यश मिळविण्यासाठी आपलं कौशल्य कधीच कोणाला सांगू नये. आपलं कौशल्य आणि आवड नेहमी अशाच व्यक्तीला सांगा जी तुमच्या फार जवळची व्यक्ती असेल. जेणेकरून, तुम्हाला याचा फायदा होईल. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Astrology : आज बुधादित्य योगासह जुळून आलेत शुभ योग; कन्यासह 'या' 4 राशींना लाभच लाभ, अडकलेली कामं लागणार मार्गी