Chanakya Niti : आचार्य चाणक्य (Chanakya) यांचे विचार आजही समाजात अनेकजण फॉलो करतात. ते एक महान अर्थशास्त्रज्ञ तसेच तत्वज्ञ होते. आचार्य चाणक्य (Chanakya Niti) यांच्या नीतीने व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडू लागतात. आयुष्याच्या प्रत्येक गोष्टीवर चाणक्य नीती भाष्य करतात. त्याचबरोबर चाणक्य यांनी चांगल्या घराबद्दल सुद्धा आपले विचार मांडले आहेत. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, ज्या घरात या तीन गोष्टी कधीच होत नाही तिथे सुख-शांती नांदत नाही. 


आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार, ज्या घरात मंगल कार्य वेळेवर होतात. वेद मंत्रांचा उच्चार केला जातो, ज्यांची संतान बुद्धिमान, पत्नीची वाणी मधुर, ज्यांच्या घरी धन-संपत्ती सत्कर्माने येत असेल, पाहुण्यांचा पाहुणचार होत असेल, मोठ्यांचा मान-सन्मान केला जात असेल अशा घरातील व्यक्ती सर्वात जास्त सुखी असतात. 


आचार्य चाणक्य म्हणतात की, जर व्यक्तीला सुखी जीवन हवं असेल तर त्यांनी चुकीच्या गोष्टींचा विचार करु नये, तसेच, धार्मिक कार्यात आपलं मन गुंतवावं. यामुळे तुम्हाला चांगला लाभ मिळू शकतो. 


श्लोक


न विप्रपादोदककर्दमानि न वेदशास्त्रध्वनिगर्जितानिI
स्वाहा-स्वधाकार-विवर्जितानि श्मशानतुल्यानि गुहाणि तानिII


श्लोकाचा अर्थ


आचार्य चाणक्य यांनी आपल्या श्लोकात अशा काही कार्यांबद्दल सांगितलं आहे ज्यांना केलं नाही तर ते घर घर राहत नाही तसेच त्या ठिकाणी सुख-शांती देखील टिकत नाही. 


ब्राह्मणांचा सन्मान न करणे 


आचार्य चाणक्य म्हणतात की, घरातील कुटुंबीयांची सुख-शांती, प्रगती ही गराशी संबंधित असते. अशातच काही कार्य घरात करणे गरजेचं आहे. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. आचार्य चाणक्य म्हणतात की, ज्या घरात ब्राह्मणांचा आदर-सन्मान केला जात नाही, त्यांचा अपमान केला जातो अशा घरात सुख-शांती नांदत नाही. 


घरात पूजा पाठ न करणे 


आचार्य चाणक्य सांगतात ज्या घरात पूजा पाठ होत नसेल, मंत्रांचा जप केला जात नसेल अशा घरात कधीच देवी-दैवतांचा वास नसतो. अशा जागी दारिद्र्य येते. 


घरात शुभ कार्य न होणं 


ज्या घरात कोणत्याही प्रकारची शुभ कार्य होत नसतील त्या घरात सुख-शांती नांदत नाही. अशा ठिकाणी सकारात्मक ऊर्जा निर्माण होत नाही. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Ganesh Chaturthi 2024 : घरात गणपतीची स्थापना करताना 'या' 10 गोष्टींची काळजी घ्या; जाणून घ्या बाप्पाच्या स्थापनेचा शुभ मुहूर्त