Chalisa Yog 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच दिवशी एक विशेष संयोग जुळून येणार आहे. मात्र, त्या आदल्याच दिवशी शुक्र आणि शनि ग्रह एकमेकांच्या 40 अंशावर असून चालीसा योग निर्माण करणार आहे. ज्योतिष शास्त्रात, शुक्र आणि शनिला एकमेकांचा मित्र ग्रह मानतात. त्यामुळेच, काही राशींसाठी हा योग फार शुभकारक असणार आहे. तर, काही राशींना या काळात अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागेल. या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या बाराव्या चरणात चालीसा योग निर्माण होणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला आर्थिक बाबतीत निर्णय घेताना सावधानता बाळगावी लागणार आहे. तसेच, या काळात चुकूनही दूरच्या प्रवासाला जाऊ नका. जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. तसेच, या काशात तुम्हाला धैर्य आणि संयम बाळगणं गरजेचं आहे. यावर उपाय म्हणजे तुम्ही नियमित हनुमान चालीसाचं पठण करु शकता.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांनी या काळात सावधानता बाळगण्याची गरज आहे. कारण शुक्र आणि शनि हे दोन्ही ग्रह या राशीचा स्वामी ग्रह सूर्य ग्रहाचे विरोधी ग्रह मानतात. तसेच, तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ उशिराने मिळेल. तसेच, तुम्हाला मानसिक संतुलन राखण्याची गरज आहे. तसेच, या काळात महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन देण्याची गरज आहे.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ कठीण असणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला एकाग्रतेने काम करावं लागेल. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमची परिस्थिती अनुकूल नसल्यामुळे कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला सतर्कता बाळगण्याची गरज आहे. यावर उपाय म्हणून तुम्ही भगवान शंकराची पूजा करु शकतात. तसेच, योग आणि ध्यान करण्याची गरज आहे.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
