Chaitra Navratri 2026 : चैत्र नवरात्रीचा (Chaitra Navratri) उत्सव हा हिंदू धर्मात फार महत्त्वाचा मानला जातो. याची सुरुवात चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून होते. चैत्र नवरात्रीचा उत्सव दरवर्षी मार्च किंवा एप्रिल या कालावधीत येतो. धार्मिक मान्यतेनुसार, होळीनंतर हा सर्वात मोठा काळ मानला जातो. नवरात्रीच्या या नऊ दिवसांत देवीच्या नऊ रुपांची पूजा केली जाते. तर, पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते. यंदाची चैत्र नवरात्र फार खास असणार आहे. कारण, यंदा चैत्र नवरात्रीला तीन शुभ योगांचा संयोग जुळून आला आहे.
चैत्र नवरात्रीची सुरुवात कधीपासून होते?
द्रिक पंचांगानुसार, चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी 19 मार्च 2026 रोजी गुरुवारी सकाळी 6 वाजून 52 मिनिटांनी सुरु होणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच, 20 मार्च रोजी सकाळी 4 वाजून 52 मिनिटांपर्यंत ही तिथी असेल. मात्र, उदय तिथीनुसार, 19 मार्च रोजी चैत्र नवरात्रीची सुरुवात होईल.
चैत्र नवरात्र 2026 शुभ योग
यंदा नवरात्रीची सुरुवात 3 खास शुभ योगांनी होतेय. यामध्ये शुक्ल योग, ब्रह्म योग आणि सर्वार्थ सिद्धी योगचा समावेश आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, हे योग फार अनुकूल आणि महत्त्वाचे मानले जातात. तसेच, या दिवशी पूजा-पाठ केल्यास उत्तम फळ मिळतं अशी मान्यता आहे.
कलश स्थापना शुभ मुहूर्त
ज्योतिष शास्त्रानुसार, 19 मार्च रोजी घटस्थापनेच्या दिवशी दोन विशेष शुभ योग जुळून येणार आहेत. यामध्ये सकाळचा मुहूर्त सर्वात श्रेष्ठ मानला जातो. जर तुम्ही या वेळेत कलश स्थापना नाही करु शकलात तर दुपारी अभिजीत मुहूर्तातसुद्धा तुम्ही पूजा करु शकता.
19 मार्च रोजी पहिला शुभ काळ सकाळी 6 वाजून 52 मिनीटांपासून सुरु होऊन ते 7 वाजून 43 मिनिटांपर्यंत असणार आहे.
दुसरा शुभ मुहूर्त दुपारी 12 वाजून 5 मिनिटांपासून ते 12 वाजून 53 मिनिटांपर्यंत असणार आहे.
चैत्र नवरात्रीच्या आदल्या दिवशी अन्य शुभ मुहूर्त
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अनेक महत्त्वाचे मुहूर्त असणार आहेत. यांना विशेष महत्त्व आहे.
ब्रह्म मुहूर्त - सकाळी 4 वाजून 51 मिनिटांपासून ते 5 वाजून 39 मिनिटांपर्यंत असणार आहे.
प्रात: संध्या - सकाळी 5 वाजून 15 मिनिटांपासून ते 6 वाजून 26 मिनिटांपर्यंत असणार आहे.
विजय मुहूर्त - दुपारी 2 वाजून 30 मिनिटांपासून ते 3 वाजून 18 मिनिटांपर्यंत असणार आहे.
गोधुलि मुहूर्त - संध्याकाळी 6 वाजून 29 मिनिटांपासून ते 6 वाजून 53 मिनिटांपर्यंत असणार आहे.
सायं संध्या - संध्याकाळी 6 वाजून 32 मिनिटांपासून ते 7 वाजून 43 मिनिटांपर्यंत असणार आहे.
अमृत काळ - रात्री 11 वाजून 32 मिनिटांपासून ते 1 वाजून 03 मिनिटांपर्यंत असणार आहे.
निशिता मुहूर्त - रात्री 12 वाजून 05 मिनिटांपासून ते 12 वाजून 52 मिनिटांपर्यंत असणार आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
