Chaitra Amavasya 2026 : यंदाची चैत्र अमावस्या नेमकी कधी? अमावस्येला दानधर्म का करतात? वाचा ज्योतिष शास्त्रानुसार A to Z माहिती
Chaitra Amavasya 2026 : चैत्र अमावस्या येत्या 17 एप्रिल 2026 रोजी आहे. या दिवशी केलेल्या धार्मिक कार्यांना विशेष महत्त्व असते.

Chaitra Amavasya 2026 : हिंदू धर्मशास्त्रानुसार, चैत्र अमावस्या (Chaitra Amavasya) ही हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते. कारण ही हिंदू वर्षातील शेवटची अमावस्या असते. ही अमावस्या येत्या 17 एप्रिल 2026 रोजी आहे. या दिवशी केलेल्या धार्मिक कार्यांना विशेष महत्त्व असते. या संदर्भात अधिक माहिती डॉ. भूषण ज्योतिर्विद यांनी दिली आहे ती जाणून घेऊयात.
चैत्र अमावस्येचे महत्त्व (Importance of Chaitra Amavasya 2026)
१. पितृ तर्पण आणि श्राद्ध कर्म
अमावस्या ही तिथी पितरांना समर्पित असते. चैत्र अमावस्येला पितरांच्या नावाने तर्पण, श्राद्ध किंवा दानधर्म केल्याने त्यांना गती मिळते आणि त्यांचे आशीर्वाद लाभतात, अशी श्रद्धा आहे. यामुळे घरातील 'पितृदोष' दूर होण्यास मदत होते.
आत्मशुद्धी आणि पवित्र स्नान
या दिवशी गंगा, गोदावरी किंवा इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला मोठे महत्त्व आहे. असे मानले जाते की, चैत्र अमावस्येला पवित्र स्नान केल्याने वर्षभरातील पापं धुवून निघतात आणि मनाची शुद्धी होते.
दानधर्माचे महत्त्व
या दिवशी गरीब आणि गरजू लोकांना अन्न, वस्त्र किंवा धान्य दान केल्याने पुण्य मिळते. विशेषतः सातू (जव), तीळ आणि पाण्याचे दान करणे फलदायी मानले जाते.
1. कालसर्प पितृदोष साडे सती आणि ग्रह दोषावर उपाय साठी उत्तम
ज्यांच्या कुंडलीत 'कालसर्प दोष' ग्रहण दोष, पितृ दोष किवा अन्य दोष असतो, त्यांच्यासाठी चैत्र अमावस्येचा दिवस पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी हवन शिव मंदिरात जाऊन पूजा केल्याने दोषाची तीव्रता कमी होते असे मानले जाते.
आध्यात्मिक साधना
अमावस्येची रात्र ही तंत्र-मंत्र आणि विशेष साधनेसाठी महत्त्वाची मानली जाते. अनेक साधक या दिवशी शांत ठिकाणी बसून नामस्मरण किंवा ध्यान करतात, ज्यामुळे मानसिक शांती मिळते.
डॉ. भूषण ज्योतिर्विद
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Shani Sade Sati : शनिच्या साडेसातीचा 'हा' टप्पा सर्वात भयानक; नोकरी, पैसा, आरोग्य सगळंच...मेष, कुंभ, मीन राशीच्या लोकांना...



















