Chaitra Amavasya 2025: ज्योतिषशास्त्रानुसार एप्रिल महिन्याच्या शेवटच्या काळात ग्रह-ताऱ्यांच्या हालचालींमुळे अनेक लोकांच्या आयुष्यात मोठे बदल होताना दिसणार आहेत. एकीकडे काही लोकांसाठी हे दिवस चिंतामुक्त करणारे असतील, तर काही राशींच्या लोकांसाठी मात्र टेन्शन देणारे असतील. अशात 27 एप्रिलच्या दिवशी चैत्र अमावस्या येत आहे. या दिवशी चंद्र, बुध आणि शुक्राचे भ्रमण होत आहे. ज्याचा अशुभ प्रभाव काही राशींवर होताना दिसणार आहे. जाणून घ्या त्या राशींबद्दल, तसेच अशुभ प्रभाव टाळण्यासाठी काय काळजी घ्याल?
27 एप्रिल 2025 पासून 3 राशीच्या लोकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक
वैदिक पंचांगाशास्त्रानुसार 27 एप्रिल 2025 च्या दिवशी चैत्र अमावस्या आहे, धार्मिक आणि ज्योतिषीय दृष्टिकोनातून हा दिवस खूप खास आहे. मात्र अशात चंद्र, बुध आणि शुक्र वेगवेगळ्या राशींमध्ये आणि नक्षत्रांमध्ये प्रवेश करणार आहेत, वैदिक दिनदर्शिकेच्या गणनेनुसार, 27 एप्रिल रोजी पहाटे 3:38 वाजता, सर्वप्रथम चंद्र मेष राशीत प्रवेश करेल, त्यानंतर पहाटे 3:42 वाजता बुध रेवती नक्षत्रात प्रवेश करेल. तर रविवारच्या समाप्तीपूर्वी सूर्य रात्री 07:19 वाजता भरणी नक्षत्रात प्रवेश करेल. ज्याचा सर्व 12 राशींच्या जीवनावर एकत्रित परिणाम होईल. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास, 27 एप्रिल 2025 पासून 3 राशीच्या लोकांनी अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे अशा राशींबद्दल जाणून घेऊया.
ग्रहांच्या संक्रमणाचा अशुभ प्रभाव विविध राशींवर कशाप्रकारे होईल?
मेष
- मेष राशीच्या लोकांनी 27 एप्रिल 2025 पासून अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
- व्यावसायिकांनी घाईगडबडीत कोणताही करार करू नये.
- व्यावसायिकांसाठी यावेळी परदेश प्रवास करणे योग्य ठरणार नाही.
- कोणत्याही कामात नशीब साथ देणार नाही.
- निष्काळजीपणामुळे गंभीर दुखापत होण्याची शक्यता आहे.
- विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करणार नाहीत.
वृषभ
- ग्रहांच्या संक्रमणाचा आर्थिक परिस्थितीवर नकारात्मक प्रभाव पडेल.
- वृद्ध लोकांचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य कमजोर राहील.
- अशा परिस्थितीत तुम्ही जितके जास्त ध्यान कराल तितके चांगले होईल.
- विद्यार्थ्यांचे मन चुकीच्या ठिकाणी भरकटण्याची शक्यता आहे.
- तरुणांना कॉलेजमध्ये वरिष्ठांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे.
- उद्योगपतींना परदेशाशी संबंधित प्रकल्पांमध्ये यश मिळणार नाही, ज्यामुळे कंपनीच्या प्रतिमेवरही परिणाम होईल.
कुंभ
- आर्थिक वृद्धी होणार नाही, त्यामुळे व्यापारी आणि कार्यरत व्यावसायिक अडचणीत राहतील.
- कुटुंबात समस्या निर्माण होतील.
- रोमँटिक जीवनात तणाव राहील.
- उच्च शिक्षणासाठी परदेशात जाणे योग्य होणार नाही.
- व्यावसायिक भागीदारासोबत प्रवास करणे योग्य ठरणार नाही.