Capricorn Weekly Horoscope 13 to 19 February 2023 : फेब्रुवारी 2023 चा पहिला आठवडा म्हणजे 13 ते 19 फेब्रुवारी हा मकर राशीच्या लोकांसाठी चांगला काळ असणार आहे. या आठवड्यात खोटे बोलणे टाळावे, कारण त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात. व्यावसायिकांसाठी काळ थोडा कठीण आहे. त्यामुळे तुमच्या व्यवसायाबाबत घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नये. प्रेमप्रकरणात किरकोळ वाद होऊ शकतात, परंतु ते सामान्य राहील. आरोग्याची काळजी घ्या, कुटुंबासोबत वेळ घालवा. या आठवड्यात तुमचे तारे काय म्हणतात? जाणून घ्या मकर साप्ताहिक राशीभविष्य
मकर साप्ताहिक राशिभविष्यआठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही एखाद्या लाभासाठी तुमचे भविष्यात होणारे नुकसान टाळले पाहिजे. कामाची जागा असो किंवा घर, तुमच्याकडून चूक झाली असेल, तर खोटे बोलण्याऐवजी ते स्वीकारणे योग्य ठरेल, ती बाब उघड झाल्यावर तुम्हाला अधिक लाज तसेच कमीपणा वाटू शकतो. मालमत्तेशी संबंधित काही वाद असेल तर तो न्यायालयात नेण्याऐवजी वाटाघाटीने सोडवणे योग्य ठरेल.
कोणताही निर्णय घाईत घेणे टाळावेमकर राशीच्या व्यावसायिकांनी त्यांच्या व्यवसायाशी संबंधित कोणताही निर्णय घाईत किंवा गोंधळात घेणे टाळावे, अन्यथा तुम्हाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागेल. सुखी वैवाहिक जीवनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या कामाच्या किंवा व्यवसायाशी संबंधित कामातून कुटुंब आणि घरासाठी वेळ काढावा लागेल. प्रेम संबंधात आंबट-गोड वाद होतील, जे सामान्य राहतील. विविध आजारांपासून सावध राहा आणि आरोग्याची काळजी घ्या.
या आठवड्यात तुमची कार्यक्षेत्रात प्रगती होईलमकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला राहील. या आठवड्यात तुमची कार्यक्षेत्रात प्रगती होईल. यासोबतच तुम्हाला तुमचा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी अनेक संधी मिळतील. या आठवड्यात तुम्हाला प्रवासातूनही खूप दिलासा मिळेल आणि प्रवासादरम्यान मन शांत राहील. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल, आरोग्यामुळे तुमचा खर्च जास्त होणार आहे. शुभ दिवस: 11,12,16
प्रेम जीवनासाठी हा आठवडा कसा असेल? मकर राशीच्या प्रेम जीवनात हा आठवडा शांततापूर्ण जाईल आणि परस्पर प्रेम अधिक दृढ होईल. आठवड्याच्या सुरुवातीलाच काही चांगली बातमी मिळू शकते. एकमेकांना भेटण्याची संधी मिळेल आणि नात्यात गोडवा ठेवण्याचा प्रयत्न कराल. आठवड्याच्या शेवटी मन उदास होईल आणि परस्पर प्रेमात अस्वस्थता जाणवेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर बातम्या