Capricorn Horoscope Today 7 November 2023 : मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) उत्तम राहील. आज तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. तुमच्या कुटुंबात काही गोष्टींबद्दल खूप आनंद होईल. व्यावसायिक लोकांसाठी देखील, तुमचा व्यवसाय खूप चांगला होईल. तुम्ही तुमच्या व्यवसायात काही नवीन काम सुरु करू शकता, ज्यामुळे अधिक प्रगती होईल आणि तुम्हाला त्यात मोठा नफाही मिळू शकेल. आरोग्याची विशेष काळजी घ्या. तुमच्या डोळ्यांशी संबंधित कोणतीही समस्या तुम्हाला त्रास देऊ शकते, ज्यामुळे तुम्ही चिंतेत राहू शकता.


तुमचा आजचा दिवस अधिक चांगला असेल. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा तणाव येणार नाही. तुम्ही टेन्शन फ्री राहाल. आज तुम्ही तुमच्या एखाद्या जुन्या मित्राला भेटू शकता, ज्याला भेटून तुम्हाला खूप आनंद होईल. व्यवसायात तुम्हाला काही फायदा होऊ शकतो. नोकरदार लोकांसाठी आजचा दिवस सावधानतेचा असेल. जर तुम्ही कुठे बाहेर जात असाल तर तुम्ही तुमचे काम तुमच्या सहकाऱ्याकडे सोपवावे, अन्यथा तुम्हाला नंतर समस्यांना सामोरे जावे लागू शकते आणि तुमच्या कामावर परिणाम होऊ शकतो. तुमचे मन तुमच्या मुलांबद्दल थोडेसे चिंतेत असेल आणि तुमच्या जोडीदाराबाबत तुम्ही निश्चिंत राहाल. 


रागावर नियंत्रण ठेवा


मकर राशीच्या (Capricorn Horoscope) लोकांच्या कुटुंबात (Family) एखाद्या गोष्टीवरुन वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. घराच्या शांततेसाठी तुम्ही संयम ठेवणं गरजेचं आहे. तसेच, रागावर नियंत्रण ठेवा. संध्याकाळचा वेळ मित्रांसोबत मजेत जाईल, यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घ्या. तसेच, शारीरिकदृष्ट्या योगसाधनेला महत्त्व द्या. 


आज मकर राशीचे आरोग्य 


मकर राशीच्या लोकांचे आरोग्य चांगले राहील परंतु आळस मानसिकदृष्ट्या जास्त राहील. मॉर्निंग वॉक आणि योगासने अशा वेळी फायदेशीर ठरतील.


मकर राशीसाठी आजचे उपाय 


तांदूळ लाल रंगाच्या कपड्यात ठेवा आणि पाच जपमाळ 'ओम श्रीं श्रीं नम:' मंत्राचा उच्चार करुन धन ठेवलेल्या ठिकाणी ठेवा.


मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग


 मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग भगवा आहे. तर, मकर राशीसाठी आजचा लकी नंबर 8 आहे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या : 


Horoscope 2024: नववर्ष 2024 मध्ये उजळणार 'या' 4 राशींचं भाग्य; संपत्तीत होणार वाढ, गुरू-शनिची होणार कृपा