Capricorn Horoscope Today 31 May 2023 मकर राशीच्या (Capricorn Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. कुटुंबातील (Family) सदस्यांचे सहकार्य मिळेल, सर्व लोक एकत्र एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्यासाठी जातील, जिथे सर्व लोक खूप आनंदी दिसतील. तुमचे प्रेम जीवन आनंदाने भरलेले असेल. वडिलांच्या माध्यमातून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याची चिन्हे आहेत. घरोघरी शुभ कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. शेजाऱ्यांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. आज तुम्ही मन:शांतीसाठी धार्मिक कार्यक्रमातही थोडा वेळ घालवा. वैवाहिक जीवनात (Married Life) गोडवा दिसून येईल. जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक (Investment) करायची असेल तर त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल. मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. राजकारणात करिअर करण्याची चांगली संधी आहे.


वादाची परिस्थिती टाळा


मकर (Capricorn) राशीचे व्यापारी, नोकरदार आणि व्यावसायिकांना लाभ मिळण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. आज तुम्ही कठोर परिश्रमाच्या जोरावर बरेच काही साध्य करु शकता. व्यवसाय कर्जाच्या माध्यमातून भांडवली गुंतवणूक वाढवण्याचा प्रयत्न करा. आज धनु राशीच्या नोकरदार लोकांनी आपली कामे योग्य करावीत आणि वादाची परिस्थिती टाळावी.


कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे तर मकर राशीच्या (Capricorn Horoscope) लोकांचा दिवस मध्यम फलदायी राहील. कुटुंबात एखाद्या गोष्टीवरुन वादाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. घरातील शांततेसाठी गोष्टींकडे दुर्लक्ष करुन पुढे जाणेच फायद्याचे ठरेल. संध्याकाळचा वेळ मित्रांसोबत मजेत घालवा, यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या तब्येतीची काळजी घ्या. तसेच, शारीरिकदृष्ट्या योगसाधनेला महत्त्व द्या. 


आज मकर राशीचे आरोग्य 


मकर राशीच्या लोकांचे आरोग्य चांगले राहील परंतु आळस मानसिकदृष्ट्या वरचढ राहील. मॉर्निंग वॉक आणि योगासने अशा वेळी फायदेशीर ठरतील.


मकर राशीसाठी आजचे उपाय 


तांदूळ लाल रंगाच्या कपड्यात ठेवा आणि पाच जपमाळ 'ओम श्री श्री नम:' मंत्राचा उच्चार करुन धन ठेवलेल्या ठिकाणी ठेवा.


मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 


मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पोपटी आहे. तर, मकर राशीसाठी आजचा लकी नंबर 3 आहे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या : 


Horoscope Today 31 May 2023 : वृषभ, मकर, कुंभ राशीच्या लोकांनी चुकूनही 'हे' काम करू नये; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य