Capricorn Horoscope Today 09 June 2023 : मकर राशीच्या (Capricorn Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला आहे. आज तुम्ही तुमच्या दिनचर्येत काही बदल करा, ज्यामुळे तुम्हाला खूप उत्साही वाटेल. आज एखाद्या मित्राच्या मदतीने तुम्हाला काही उत्पन्नाच्या संधीही मिळू शकतात. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून काही वेळ तुमच्या कुटुंबातील (Family) सदस्यांसाठी देखील काढा. त्यांच्याबरोबर काही धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हा, ज्यामुळे तुमच्या मनाला खूप शांती मिळेल. नवीन वाहनाचा आनंदही मिळेल. तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होईल. तुमचे आरोग्य (Health) चांगले राहील. मित्रांचं (Friends) सहकार्य आज तुमच्यासाठी फार मोलाचं ठरणार आहे.


आज वैवाहिक जीवनात असेल गोडवा


मकर राशीच्या वैवाहिक जीवनात आजचा दिवस खास असणार आहे. आज तुमच्या प्रिय व्यक्तीकडून तुम्हाला भेटवस्तू मिळू शकते. त्यामुळे तुम्ही खूप आनंदी असाल.  आज जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल. आज तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी दिलेली कामे वेळेवर पूर्ण कराल, तुमची मेहनत, समर्पण आणि उत्साह पाहून तुमच्या वरिष्ठांना खूप आनंद होईल. आजचा दिवस तुमच्या सर्वोत्तम दिवसांपैकी एक असू शकतो. दिवसभरात तुम्ही भविष्यासाठी चांगल्या योजना आखू शकता.


आजच्या दिवशी मित्रााचं सहकार्य तुमच्यासाठी फार मोलाचं ठरणार आहे. मित्राच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाच्या अनेक संधी उपलब्ध असतील. तसेच, घर, फ्लॅट इत्यादी खरेदी करण्याची योजना आखण्यासाठी चांगला दिवस आहे. जे प्रॉपर्टी डीलिंगचे काम करतात, त्यांना आज चांगली डील मिळू शकते. नातेवाईकांकडून चांगली सुवार्ता समजेल. भावंडांविषयी कौतुक वाटेल. धार्मिक गोष्टीत उत्साह टिकून राहील.


आज मकर राशीचे आरोग्य 


आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी अति ताणामुळे मानसिक तणाव जाणवू शकतो. अशा वेळी शांत बसून ध्यान करणं फायदेशीर ठरेल.  


मकर राशीसाठी आजचे उपाय


पिवळे वस्त्र परिधान करून केळीच्या झाडाची पूजा करा आणि संध्याकाळी तुळशीच्या झाडावर तुपाचा दिवा लावा.


मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 


मकर राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग भगवा आहे. तर, मकर राशीसाठी आजचा लकी नंबर 99 आहे.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


महत्त्वाच्या बातम्या : 


Horoscope Today 09 June 2023 : वृषभ, सिंह, तूळसह 'या' राशीच्या लोकांनी खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं; जाणून घ्या सर्व राशींचे आजचे राशीभविष्य