Jupiter : गुरुवार हा भगवान बृहस्पती विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे असे मानले जाते. या दिवशी लोक पूर्ण विधीपूर्वक या देवतांची पूजा करतात. गुरु बलवान असेल तर व्यक्तीच्या जीवनात खूप प्रगती होते. सर्व कामे यशस्वी होतात आणि आर्थिक स्थिती मजबूत होते. याउलट गुरु कमजोर असेल तर व्यक्तीला प्रत्येक कामात अपयश येते आणि आर्थिक चणचणही जाणवते. असे मानले जाते की, गुरुवारी केलेल्या काही गोष्टींची खरेदी गुरु ग्रहाला बळ देते.
गुरुवारी या वस्तू खरेदी करणे शुभ असते
ज्योतिषशास्त्रानुसार गुरुवारी सोने-चांदी किंवा कोणतेही कापड खरेदी करणे खूप शुभ असते. गुरुवारी या वस्तू खरेदी केल्याने गुरु ग्रह बलवान होतो. दुसरीकडे गुरुवारी चाकू, कात्री किंवा लोखंडी वस्तू यांसारख्या धारदार वस्तू खरेदी करण्यास मनाई आहे. गुरुवारी पूजेशी संबंधित वस्तू खरेदी करू नयेत. या सर्व गोष्टी गुरुवारी केल्याने कुंडलीत गुरूची स्थिती मजबूत होते.
गुरुवारी हे काम करू नका
ज्योतिष शास्त्रानुसार गुरुवारी काही कामे केल्याने नुकसान होते. उदाहरणार्थ गुरुवारी साबण वापरणे, कपडे धुणे किंवा महिलांचे केस धुणे शुभ मानले जात नाही. या दिवशी घराची साफसफाईही करू नये. असे केल्याने घरात दारिद्र्य येते असे मानले जाते. गुरुवारी कोणाला उधार देऊ नका आणि कोणाकडून उधार घेऊ नका. असे मानले जाते की गुरुवारी असे केल्याने आर्थिक संकटाची परिस्थिती निर्माण होते. पती-पत्नीमध्ये काही समस्या असल्यास दोघांनीही गुरुवारी व्रत करावे. यामुळे दोघांच्या जीवनात सुख आणि सौभाग्य वाढते.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
संबंधित बातम्या