Budhaditya Yog 2025: अखेर उद्यापासून ऑगस्ट महिन्याची सुरूवात होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, या महिन्याचे अनेक मोठ्या ग्रहांचे संक्रमण होत असल्याने काही शुभ योग देखील बनत आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेलं तर ऑगस्ट महिन्याची सुरुवात एका अद्भुत बुधादित्य राजयोगाने होत आहे. ज्यामुळे काही राशींच्या लोकांना याचा भरपूर फायदा होणार आहे. पुढील 17 दिवस 3 राशींना भरपूर धन मिळेल. ज्योतिषशास्त्रात बुधादित्य योग हा खूप शुभ आणि प्रभावी योग मानला जातो. त्याचा परिणाम सर्व राशींवर होईल, परंतु 3 राशींना सर्वाधिक फायदा होईल. जाणून घेऊया..
पुढील 17 दिवस 3 राशींची चांदीच चांदी!
ज्योतिषशास्त्रानुसार, सध्या सूर्य आणि बुध कर्क राशीत एकत्र बसले आहेत. सूर्य-बुध यांच्या या युतीमुळे पुढील 17 दिवस 3 राशींना भरपूर धन मिळेल. ज्योतिषशास्त्रानुसार, 16 जुलै रोजी सूर्य कर्क राशीत संक्रमण करतो. त्यानंतर बुधानेही कर्क राशीत संक्रमण केले आहे. सूर्य आणि बुध यांच्या युतीमुळे बुधादित्य योग निर्माण होतो, जो सध्या कर्क राशीत आहे.
17 ऑगस्टपर्यंत लाभच लाभ...
ज्योतिषशास्त्रानुसार, 17 ऑगस्टपर्यंत सूर्य कर्क राशीत राहील. त्यामुळे 17 ऑगस्टपर्यंत बुधादित्य राजयोग प्रभावी राहील. ज्योतिषशास्त्रात बुधादित्य योग हा खूप शुभ आणि प्रभावी योग मानला जातो. त्याचा परिणाम सर्व राशींवर होईल, परंतु 3 राशींना सर्वाधिक फायदा होईल.
कर्क
ज्योतिषशास्त्रानुसार, कर्क राशीत बुधादित्य योग तयार होत आहे आणि त्यामुळे या राशीच्या लोकांना खूप फायदा होईल. तुम्हाला तुमच्या कारकिर्दीत प्रगती मिळेल, उलट एक नवीन सुरुवात करता येईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. नशीब तुम्हाला साथ देईल. तुम्ही कोणतेही काम कराल, त्यात तुम्हाला यश मिळेल.
कन्या
ज्योतिषशास्त्रानुसार, कन्या राशीचा स्वामी बुध आहे आणि बुधादित्य राजयोग या राशीच्या लोकांना खूप फायदे देईल. प्रलंबित काम पूर्ण होईल. कुटुंबातील सदस्य तुम्हाला प्रत्येक पावलावर साथ देतील. संपत्ती वाढेल.
मीन
ज्योतिषशास्त्रानुसार, बुधादित्य योग मीन राशीच्या लोकांनाही फायदा देईल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. तुम्हाला अडकलेले पैसे मिळू शकतील. वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल आणि नशीब तुम्हाला साथ देईल.
हेही वाचा :
Numerology: ऑगस्टची सुरूवात होताच 'या' जन्मतारखेच्या लोकांचे 'अच्छे दिन' सुरू, बॅंक बॅलेन्स वाढणार, करिअरला मिळणार दिशा
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)