Budhaditya Rajyog 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्य देवाला आत्मा, पिता, मान-सन्मानाचा कारक ग्रह मानतात. त्यानुसार, आज सकाळी 7 वाजून 53 मिनिटांनी सूर्य देवाने सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश केला आहे. कन्या राशीत ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह आधीपासूनच उच्च अवस्थेत विराजमान आहे. अशात सू्र्य आणि बुध ग्रहाच्या युतीने कन्या राशीत महाशक्तीशाली असा 'बुधादित्य राजयोग' (Budhaditya Rajyog) निर्माण होणार आहे. 26 सप्टेंबर रोजी बुध ग्रह तूळ राशीत संक्रमण करणार आहे. त्यामुळे बुधादित्य राजयोग आजपासून 26 सप्टेंबरपर्यंत प्रभावी असणार आहे. त्यामुळे कोणकोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते जाणून घेऊयात.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीचा स्वामी सूर्य देव आहे. या राशीच्या दुसऱ्या चरणात बुधादित्य योग निर्माण होणार आहे. त्यामुळे या राशीला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच, तुम्हाला तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवावं लागेल. तुमची अनेक रखडलेली कामे या काळात पूर्ण होतील. वडिलोत्पार्जित संपत्तीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. या कालावधीत मित्रांच्या सहकार्याने तुमची अनेक रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीतच बुधादित्य राजयोग निर्माण होणार आहे. त्यामुळे तुमच्या आत्मविश्वासात चांगली वाढ झालेली दिसेल. तुमच्यातील नेतृत्व क्षमता वाढेल. तसेच, समाजात तुमची वेगळी ओळख निर्माण होईल. अनेक दिवसांपासून तुमची रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. तुमच्या कामावर तुमचं चांगलं प्रभुत्व असेल. अनेकजण तुमच्या कामाचा आदर्श घेतील.
धनु रास (Saggitarius Horoscope)
धनु राशीच्या दहाव्या चरणात हा राजयोग निर्माण होणार आहे. या काळात तुमच्या कार्यक्षेत्रावर चांगला प्रभाव दिसून येईल. करिअरमध्ये प्रगतीची संधी निर्माण होईल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना चांगलं प्रमोशन मिळेल. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. तुम्ही हाती घेतलेल्या कार्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
इतर महत्त्वाच्या बातम्या :
