Budh Yam Yuti 2025 : महागड्या गाड्या, मोठ्ठं घर आणि भरपूर बॅंक बॅलेन्स...बुध-यम केंद्र योगामुळे 'या' राशींची होणार चांदीच चांदी, श्रीमंतीचे वाहतील वारे
Budh Yam Yuti 2025 : बुध ग्रह तूळ राशीत राहून यम ग्रहासह मिळून शुभ योग निर्माण होणार आहे. यम ग्रह मकर राशीत आहे. तसेच, 7 ऑक्टोबर रोजी बुध-यम ग्रह एकमेकांच्या 90 डिग्रीवर असणार आहे.

Budh Yam Yuti 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांचा राजकुमार बुध आणि यम ग्रह मिळून चांगला शुभ योग (Yog) निर्माण होणार आहे. हा योग जवळपास 15 दिवसांपर्यंत असणार आहे. त्यामुळे 4 राशींना चांगला लाभ मिळणार आहे. त्यामुळे अनेक राशींच्या (Zodiac Signs) मनातील इच्छा पूर्ण होतील. येत्या 3 ऑक्टोबर 2025 रोजी बुध ग्रह (Mercury) तूळ राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राच्या राशीत म्हणजेच तूळ राशीत बुध ग्रहांचं संक्रमण फार लाभदायक ठरणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
या व्यतिरिक्त बुध ग्रह तूळ राशीत राहून यम ग्रहासह मिळून शुभ योग निर्माण होणार आहे. यम ग्रह मकर राशीत आहे. तसेच, 7 ऑक्टोबर रोजी बुध-यम ग्रह एकमेकांच्या 90 डिग्रीवर असणार आहे. यामुळे केंद्र योग निर्माण होणार आहे. हा योग 4 राशींसाठी लकी ठरणार आहे. बुध ग्रह 24 ऑक्टोबर 2025 रोजी तूळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी बुध-यमचा केंद्र दृष्टी योग फार लाभदायक ठरणार आहे. या काळात तुमच्या आर्थिक स्थितीत भरभराट होऊ शकते. तसेच, जर तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढवायचा असेल तर त्यासाठी तुम्ही लोन घेऊ शकता. तुमचा लोन पास होऊ शकतो. तसेसच, कामाच्या ठिकाणी विरोधक तुमच्यावर लक्ष ठेवून असतील. पण, तुम्ही त्यांच्यावर देखील वर्चस्व गाजवू शकता. समाजात चांगला मान-सन्मान मिळेल.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ फार लाभदायक ठरणार आहे. तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच, संपत्तीत भरभराट होण्याची शक्यता आहे. तुमचे नातेसंबंध अधिक घट्ट होतील. ग्रहांची स्थिती शुभ असल्या कारणाने देवी लक्ष्मीची देखील तुमच्यावर कृपा राहील. घरात आनंदाचं वातावरण पाहायला मिळेल. तसेच, चांगल्या लोकांच्या संपर्कात याल. धार्मिक कार्यात तुमचं मन चांगलं रमेल.
तूळ रास (Libra Horoscope)
बुध ग्रह तूळ राशीतच स्थित असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी यममुळे केंद्र योग निर्माण होणार आहे. या काळात तुमचं व्यक्तिमत्व फार आकर्षक ठरणार आहे. या दरम्यान प्रत्येक कार्यात तुमचा उत्साह दिसून येईल. तसेच, प्रत्येक कार्यात तुमचा सहभाग दिसून येईल. समाजात तुमची प्रतिमा चांगली दिसून येईल. जे लोक अविवाहित आहेत त्यांना या काळात शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीसाठी बुध-यम केंद्र योग फार लाभदायी ठरणार आहे. या काळात तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच, तुमची महत्त्वाची कामे लवकरात लवकर पार पडतील. नोकरीत उत्पन्नाच्या अनेक संधी तुमच्यासाठी निर्माण होतील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील. समाजात तुमचा सन्मान वाढलेला दिसेल. तसेच, घरात तुमच्या आनंदी वातावरण पाहायला मिळेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :















