Budh Vakri 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, बुध ग्रहाला ज्ञान, बुद्धी आणि विचारांचा कारक ग्रह मानतात. जेव्हा बुध (Budh Gochar) ग्रह उलटी चाल चालतात म्हणजेच वक्री होतात तेव्हा व्यक्तीला आपल्या अर्धवट राहिलेल्या कामांबद्दल, पूर्वीच्या योजनांबद्दल पुन्हा विचार करायला भाग पाडतात. विशेष म्हणजे, वक्री अवस्थेत बुध ग्रहाचा प्रभाव कमी नाही होत. तर अधिक वाढतो. त्यामुळे प्रत्येक वेळी बुध ग्रहाची नकारात्मक दृष्टी योग्य नसते. 

Continues below advertisement

फेब्रुवारी महिन्यात, बुध ग्रह 26 तारखेला जवळपास 23 दिवसांसाठी वक्री अवस्थेत असणार आहे. तर, 21 मार्च 2026 रोजी पुन्हा सरळ चाल चालणार आहेत. या दरम्यान बुध ग्रह काही राशींना चांगलाच लाभ देणार आहे. या राशींच्या लोकांना करिअर,  काम आणि व्यवसायात चांगला लाभ मिळेल. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी हा काळ लाभदायी असणार आहे. या काळात तुम्हाला चांगला आर्थिक लाभ मिळेल. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. गुंतवणुकीच्या संदर्भातील निर्णय घेताना सावधानता बाळगा. तसेच, घरात आनंदाचं वातावरण राहील. 

Continues below advertisement

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ लाभदायक असणार आहे. या काळात तुमचे विचार अधिक प्रगल्भ होतील. तसेच, अनेक दिवसांपासून तुमची रखडलेली कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. तुमच्या करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. 

कन्या रास (Virgo Horoscope)

या काळात कन्या राशीच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी अनेक जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. तसेच, शिक्षणाशी संबंधित तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. 

तूळ रास (Libra Horoscope)

तूळ राशीसाठी हा काळ चांगला असणार आहे. या काळात तुम्हाला तुमची चूक सुधारण्यासाठी अनेक संधी मिळतील. तसेच, तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तुमची निर्णयक्षमता अधिक चांगली दिसून येईल. तसेच, तुम्हाला परदेशात जाण्याच्या संधी निर्माण झालेल्या दिसतील. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाची वक्री चाल लाभदायक ठरणार आहे. या काळात तुम्हाला करिअरमध्ये अनेक प्रगतीच्या संधी निर्माण झालेल्या दिसतील. मित्रांबरोबर चांगला वेळ घालवाल. अनेक नवीन गोष्टी तुम्हाला शिकता येतील. तसेच, या कालावधीत तुम्ही अनेक सरकारी योजनांचा लाभ घेऊ शकता. पैशांच्या गुंतवणुकीतून तुम्हाला लाभ मिळेल. 

हे ही वाचा :                                         

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

March 2026 Monthly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी मार्चचा महिना ठरणार गेमचेंजर, 6 पैकी फक्त 2 राशी होतील मालामाल; मासिक राशीभविष्य