Budh Vakri 2026 : अवघ्या काही तासांतच बुध चालणार वक्री चाल; या 3 राशींचे उघडतील नशिबाचे दार, उद्यापासून सुवर्णकाळ सुरु
Budh Vakri 2026 : 26 फेब्रुवारी 2026 पासून म्हणजेच आजपासून बुध ग्रह वक्री चाल चालणार आहेत. बुध ग्रहाची ही स्थिती 20 मार्चपर्यंत असणार आहे.

Budh Vakri 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांच्या चालीला विशेष महत्त्व आहे. 26 फेब्रुवारी 2026 पासून म्हणजेच आजपासून बुध ग्रह वक्री (Budh Vakri) चाल चालणार आहेत. बुध ग्रहाची ही स्थिती 20 मार्चपर्यंत असणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, या दरम्यान काही राशींना चांगला लाभ मिळणार आहे. विशेष म्हणजे, या काळात तुम्हाला करिअर, व्यवसाय आणि पैशांच्या बाबतीत तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. त्यामुळे या लकी राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीसाठी हा काळ उत्साहाचा असणार आहे. जर तुम्ही व्यावसायिक असाल तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. तसेच, जर तुम्हाला एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करायची असेल तर त्यासाठी हा काळ शुभ असणार आहे. पैशांच्या बाबतीत हा काळ फार अनुकूल असणार आहे. या काळात तुम्हाला प्रमोशन किंवा नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाऊ शकतात.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीसाठी हा काळ फार सकारात्मक असणार आहे. तुम्ही घेतलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. तसेच, नशिबाची साथ तुम्हाला मिळेल. अनेक दिवसांपासून रखडलेले तुमचे काम या कालावधीत नक्कीच पूर्ण होईल. आई-वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल. नवीन योजनांचा लाभ तुम्हाला मिळेल. तसेच, मित्रांच्या सहाकार्याने तुमची अनेक कामे वेळेत पूर्ण होतील.
धनु रास (Saggitarius Horoscope)
धनु राशीसाठी बुध ग्रहाची वक्री चाल लाभदायक ठरणार आहे. या काळात तुमच्यावर असलेला कर्जाचा डोंगर कमी होईल. विनाकारण पैसे खर्च करण्यावर नियंत्रण राहील. तसेच, तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला मिळतील. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे नोकरी मिळेल. कोणताही निर्णय घेताना सामंजस्याने घ्याल. महत्त्वाच्या कामांना तुम्ही आधी प्रोत्साहन, वेळ द्याल.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















