Budh Surya Yuti 2025: ते म्हणतात ना, जेव्हा ग्रह-ताऱ्यांचे योग जुळतात, तेव्हा व्यक्तीच्या नशीबाचे चक्र देखील फिरते. ज्योतिषशास्त्रानुसार मे महिन्याचा शेवट अनेकांसाठी खास असणार आहे. जेव्हा दोन ग्रह एकाच राशीत असतात तेव्हा ग्रहांची एक युती तयार होते. शुक्रवार, 23 मे रोजी, ग्रहांचा राजकुमार बुध आणि ग्रहांचा राजा सूर्य शुक्र एकाच राशीत युती करतील. ज्यामुळे अनेकांच्या आयुष्यात मोठं वळण येण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया 23 मे रोजी कोणते ग्रह शुभ योग निर्माण करत आहेत.

23 मे तारीख खास, बुधादित्य योग भारी

ज्योतिषशास्त्रानुसार, 23 मे रोजी वृषभ राशीत बुध आणि सूर्य हे ग्रह बुधादित्य योग निर्माण करतील. या योगाचा काही राशींवर शुभ प्रभाव पडेल. 23 मे रोजी दुपारी 1:05 वाजता बुध वृषभ राशीत प्रवेश करेल, त्यानंतर बुधादित्य योग तयार होईल. बुध आणि सूर्याच्या युतीमुळे कोणत्या ३ राशींना फायदा होऊ शकतो ते जाणून घेऊया?

वृषभ

ज्योतिषशास्त्रानुसार, वृषभ राशीच्या लोकांसाठी बुधादित्य योग फायदेशीर ठरेल. करिअरशी संबंधित फायदे होऊ शकतात. व्यवसायाचा विस्तार करण्याची संधी मिळेल आणि नवीन योजना उपयुक्त ठरू शकतात. आर्थिक लाभ होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा पाठिंबा मिळू शकेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. घरात आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. धार्मिक कार्यात रस वाढेल. नोकरी करणाऱ्यांसाठी काळ चांगला राहील.

कन्या

ज्योतिषशास्त्रानुसार, कन्या राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि बुध यांची युती फायदेशीर ठरू शकते. बुधादित्य योग जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. परस्पर संबंधांमध्ये सुधारणा होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांशी संबंध सुधारू शकतात. तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल. नवीन काम सुरू करण्याची योजना आखू शकता. व्यवसाय वाढवण्याचा विचार कराल. बेरोजगारांना काम मिळू शकते. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत कुठेतरी प्रवास करण्याचा प्लॅन करू शकता.

धनु

ज्योतिषशास्त्रानुसार, धनु राशीच्या लोकांसाठी सूर्य आणि बुध यांची युती फायदेशीर ठरू शकते. संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे ज्यामुळे आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते. वादांपासून स्वतःला दूर ठेवणे चांगले राहील. व्यवसाय वाढवण्याचा विचार करेल. नोकरी करणाऱ्यांसाठी वेळ चांगला राहील आणि तुमची प्रशंसा होऊ शकते. नाते मजबूत ठेवण्यासाठी तुमचे प्रयत्न उपयुक्त ठरू शकतात.

हेही वाचा>>

June 2025 Astrology: जूनच्या सुरूवातीलाच ग्रहांचा मोठा महागेम! 'या' 5 राशींसाठी कुबेराचा खजिना उघडणार, भरपूर कमाई, प्रत्येक कामात यश

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)