Budh-Rahu Yuti 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, बुध (Mercury) ग्रह 27 फेब्रुवारी रोजी मीन राशीत संक्रमण करणार आहे. या ठिकाणी आधीपासूनच राहू ग्रह विराजमान आहे. त्यामुळे या दिवशी मीन राशीत बुध आणि राहूची युती जुळून येणार आहे. या दरम्यान राहु-बुधच्या युतीने तीन राशींच्या लोकांना चांगला लाभ मिळणार आहे.या राशी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
बुध-राहूच्या युतीने तुम्हाला चांगलाच लाभ मिळेल. या काळात तुम्ही नवीन गोष्टी शिकून घ्याल. तसेच, तुमच्या मेहनतीचं तुम्हाला चांगलं फळ मिळेल. या काळात भावा-बहिणींचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. तसेच, तुमची बऱ्याच दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. तुमचे आरोग्य उत्तम राहील. तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही. मात्र, या काळात कोणत्याही तेलकट, तिखट पदार्थांचं सेवन करु नका.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला असणार आहे. या काळात तुम्हाला चांगलं यश संपादन होईल. तसेच, तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती दिसून येईल. हा काळ तुमच्यासाठी फार अनुकूल असणार आहे. तुम्हाला मानसिक शांतता लाभेल. तसेच, घरातील वातावरण आनंदी राहील. लवकरच तुम्ही धार्मिक यात्रेला जाण्याचा योग जुळून येणार आहे. त्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
बुध-राहूच्या युतीने कुंभ राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळणार आबहे. या काळात समाजात तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात चांगला लाभ मिळेल. तसेच, तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले काम पूर्ण होईल. तसेच, समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. तसेच, विद्यार्थ्यांना शालेय जीवनात नवीन गोष्टी शिकता येतील. व्यवसायात तुम्हाला अप्रत्यक्षपणे लाभ मिळेल. सकारात्मक राहण्यासाठी नियमित योग आणि ध्यान करणं गरजेचं आहे. तसेच, तुमच्या कामातही तुम्हाला फरक जाणवेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: