Continues below advertisement

Budh Nakshatra Parivartan 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाच बुध ग्रह आपली चाल बदलणार आहे. येत्या 7 जानेवारी 2026 रोजी बुध ग्रह शुक्र ग्रहाच्या नक्षत्रात म्हणजेच पूर्वाषाढ नक्षत्रात प्रवेश करणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, बुध ग्रह बुद्धी, व्यवसाय, संवाद आणि करिअरशी संबंधित मानला जातो. अशातच बुध ग्रहाचं नक्षत्र परिवर्तन काही राशींच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणार आहे. या दरम्यान तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती दिसून येईल. तसेच, तुमच्या आर्थिक स्थितीतही बदल दिसेलकरिअरला . या लकी राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीसाठी बुध ग्रहाचं नक्षत्र परिवर्तन लाभदायी ठरणार आहे. या काळात तुमच्या विरोधकांची नजर तुमच्यावर असेल. अशा वेळी शत्रूंपासून सावध राहा. तुमच्या कामात प्रामाणिकपणा दाखवा. तसेच, नोकरी आणि व्यवसायात तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. काही लोकांच्या उत्पन्नात चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. तसेच, तुमचा मानसिक ताणही कमी झालेला दिसेल.

Continues below advertisement

धनु रास (Saggitarius Horoscope)

धनु राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचं नक्षत्र परिवर्तन शुभकारक ठरेल. या काळात तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण झालेली दिसतील. तसेच, या कालावधीत तुम्हाला काही शुभवार्ता मिळतील. तुमच्या प्रेमात गोडवा पाहायला मिळेल. तसेच, आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा झालेली दिसेल. मुलांचं अभ्यासात मन रमेल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागेल. हातातून शुभकार्य घडेल.

मीन रास (Pisces Horoscope)

मीन राशीसाठी बुध ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनाचा काळ फार शुभकारक असेल. या काळात तुमच्या अथक प्रयत्नांना चांगलं यश मिळेल. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांच्या प्रमोशनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. घरात आनंदी वातावरण राहील. तसेच, ग्रहाच्या संक्रमणामुळे तुमच्यातील साहस आणि आत्मविश्वास वाढलेला दिसून येईल. भावा-बहिणीच्या नात्यात गोडवा निर्माण होईल. मित्रांच्या सहकार्याने तुमची कामे वेळेत पूर्ण होतील. 

हे ही वाचा :                           

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Mangaladitya Yog 2026 : सूर्य-मंगळ ग्रहाच्या युतीने बनतोय वर्षातला पहिला 'मंगलादित्य राजयोग'; 9 जानेवारीपासून 'या' राशींची पाचही बोटं तुपात