Budh Margi 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांचा राजकुमार बुध ग्रहाला नवग्रहात फार महत्त्वाचं स्थान आहे. ज्योतिष शास्त्रात बुध ग्रहाला व्यवसाय, बुद्धी, वाणी, संवाद आणि बौद्धिक क्षमतेचा कारक ग्रह मानतात. अशातच बुध ग्रहाच्या स्थितीत होणारा बदल सर्व 12 राशींसाठी फार महत्त्वाचा ठरतो. 

Continues below advertisement

सध्या बुध ग्रह कुंभ राशीत वक्री अवस्थेत विराजमान आहे. तर, 21 मार्च रोजी म्हणजेच अवघ्या 24 तासांनी बुध ग्रह मार्गी चाल चालणार आहेत. याचा परिणाम सर्व राशींवर पाहायला मिळेल. तसेच, या कालावधीत तुमच्या जीवनात सकारात्मक बदल दिसून येतील. 

द्रिक पंचांगानुसार, बुध ग्रह 21 मार्च 2026 रोजी म्हणजेच शनिवारी 1 वाजून 2 मिनिटांनी कुंभ राशीत मार्गी होणार आहे. कुंभ राशीत बुध ग्रहासह मंगळ आणि राहू ग्रहसुद्धा विराजमान आहेत. 

Continues below advertisement

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या अकराव्या स्थानी बुध ग्रह मार्गी होणार आहे. त्यामुळे अनेक क्षेत्रावर याचा प्रभाव दिसेल. तसेच, हा काळ तुमचा धावपळीचा आणि मेहनतीचा असणार आहे. या कालावधीत प्रगतीचे अनेक मार्ग आहेत. भविष्याशी संबंधित तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील. तसेच, तुम्हाला भविष्यकाळात गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला असणार आहे. तसेच, भावा-बहिणीसाठी हा काळ फार शुभकारक असणार आहे. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या दहाव्या स्थानी बुध ग्रह मार्गी होणार आहे. या काळात नोकरीत तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. तुमच्या कामावर तुमचं लक्ष केंद्रित कराल. तसेच, जर तुम्हाला या काळात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असेल तर हा शुभ काळ असेल. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांना या काळात नशिबाची चांगली साथ मिळेल. या राशीच्या नवव्या चरणात बुध ग्रह मार्गी होणार आहे.  तसेच, प्रत्येक क्षेत्रात प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. नोकरीच्या नवीन संधी तुमच्यासाठी उपलब्ध होतील. नवीन योजनांचा लाभ तुम्ही घ्याल. धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल.  

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाची सरळ चाल शुभकारक असेल. या राशीच्या लग्न भावात बुध ग्रह मार्गी होणार आहे. त्यामुळे तुमची निर्णय घेण्याची क्षमता मजबूत दिसेल. तसेच, कुटुंबातील सदस्यांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. घरात आनंदी वातावरण निर्माण होईल. 

मीन रास (Pisces Horoscope)

या राशीच्या बाराव्या चरणात बुध ग्रह मार्गी होणार आहे. त्यामुळे या राशीच्या काही लोकांना चांगला लाभ मिळेल. या काळात तुमचे प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. तसेच, तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तुमच्या मेहनतीला चांगलं यश मिळेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात कोणत्या राशींना मालामाल करणार? कोणती राशी ठरेल लकी? साप्ताहिक राशीभविष्य