Budh Margi 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, बुध ग्रहाला (Budh Gochar) ग्रहांचा राजकुमार म्हणतात. हा ग्रह 21 ते 30 दिवसांच्या अंतराने राशी परिवर्तन करतात. याच दरम्यान आपल्या चालीत देखील परिवर्तन करतात. पंचांगानुसार, सध्या बुध ग्रह तूळ राशीत आहे आणि वक्री चाल चालतायत. दोन दिवसांनी बुध ग्रह वक्रीपासून मार्गी चाल म्हणजेच सरळ चाल चालणार आहेत. त्यामुळे 29 नोव्हेंबर 2025 रोजी बुध ग्रह 11 वाजून 07 मिनिटांनी मार्गी (Budh Margi) चाल चालणार आहेत.
बुध ग्रह वक्रीपासून मार्गी चाल चालल्याने काही राशींच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होणार आहे. तर काही राशींवर नकारात्मक परिणाम होईल. त्याच्यानंतर 2026 मध्ये बुध ग्रह फेब्रुवारीच्या जवळपास दोनदा वक्री चाल चालणार आहेत. बुधाच्या मार्गी चालीमुळे काही राशींना जबरदस्त लाभ मिळणार आहे.
मिथुन रास (Gemini Horoscope)
बुध ग्रहाच्या मार्गी चालीने मिथुन राशीच्या करिअरवर चांगला परिणाम होणार आहे. या काळात अनेक स्त्रोतांमधून तुम्हाला धनलाभ मिळेल. अनेक दिवसांपासून तुमची रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. बऱ्याच दिवसांनंतर बिझनेसमध्ये तुम्हाला मोठी डील मिळू शकते.
मकर रास (Capricorn Horoscope)
बुध ग्रहाच्या मार्गी चालीने मकर राशीच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडताना दिसतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. प्रॉपर्टीच्या संदर्भात तुम्ही काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकता. तसेच, एखाद्या कर्जातून तुमची सुटका होईल. घरात आनंदाचं वातावरण पाहायला मिळेल. तुम्ही हाती घेतलेल्या कामात तुम्हाला चांगलं यश मिळे. नशिबाचे दार तुमच्यासाठी खुले होतील.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीसाठी बुध ग्रहाच्या मार्गी चालीचा काळ फार शुभकारक असणार आहे. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. तसेच, नवीन प्रोजेक्टवर तुम्ही काम सुरु करु शकता. तुमच्या मेहनतीचं चांगलं फळ तुम्हाला मिळेल. तसेच, अविवाहितांसाठी शुभ विवाहाचे योग लवकरच जुळून येणार आहेत. या कालावधीत तुमचे प्रवासाचे योग जुळून येणार आहेत.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :