Budh Ketu Yuti 2025:  वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह-ताऱ्यांच्या हालचालीचा अवघ्या जगावर व्यापक परिणाम होतो. यासोबतच विविध राशींच्या लोकांवरही याचा सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होतो. तसं पाहायला गेलं तर सूर्यमालेतील सर्व 9 ग्रह एका विशिष्ट कालावधीत संक्रमण करतात, हे ग्रह इतर ग्रहांशी योग आणि युती करतात. या योग किंवा युतीचा देश आणि जगावर व्यापक प्रभाव पडतो. वैदिक पंचांगानुसार, सध्या छाया ग्रह केतू हा सिंह राशीत भ्रमण करत आहे, या राशीत बुध देखील भ्रमण करणार असल्याने, केतू आणि बुधाची युती होत आहे. जी अनेकांसाठी भाग्य घेऊन येईल..

18 वर्षांनंतर बुध आणि केतुची युती, मोठं ज्योतिषशास्त्रीय महत्त्व

ज्योतिषशास्त्रानुसार, बुध आणि केतुची हा युती 18 वर्षांनंतर होत आहे, ज्याचे ज्योतिषशास्त्रीय महत्त्व खूप आहे. सिंह राशीत केतु आणि बुध यांच्या युतीचा मानसिकता, संवाद शैली, निर्णय घेण्याची क्षमता आणि आत्म-प्रकाश या क्षेत्रावर विशेष प्रभाव पडतो. व्यक्ती असामान्य पद्धतीने विचार करते, बऱ्याचदा त्याला 'आउट ऑफ द बॉक्स' कल्पना येतात, ज्या योग्यरित्या अंमलात आणल्यास व्यक्तीचे भाग्य उजळू शकते. यापूर्वी केतूने 18 मे 2025 रोजी या राशीत प्रवेश केला होता. या सोबत आता, बुध देखील ऑगस्ट महिन्यात 30 तारखेला सिंह राशीत भ्रमण करेल. ही विशेष युती 3 राशीच्या लोकांसाठी विशेष शुभ ठरत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, जाणून घेऊया, या भाग्यवान राशी कोणत्या आहेत?ज्योतिषशास्त्रानुसार, जाणून घेऊया, कोणत्या 3 राशींसाठी ही युती सर्वात शुभ सिद्ध होण्याची शक्यता दर्शवत आहे.

मेष

ज्योतिषशास्त्रानुसार, मेष राशीच्या लोकांसाठी, सिंह राशीत बुध-केतुची युती मानसिक ऊर्जा आणि नवीन कल्पनांचा संचार करेल. या काळात, तुमच्या विचारात खोली आणि स्पष्टता असेल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या कामात सर्वोत्तम निर्णय घेऊ शकाल. तुम्हाला नवीन संधी मिळतील आणि व्यवसाय किंवा करिअरमध्येही फायदा होईल. संवाद कौशल्यात सुधारणा सामाजिक आणि व्यावसायिक संबंध मजबूत करेल. हा काळ तुमच्यासाठी आर्थिक दृष्टिकोनातूनही फलदायी ठरेल.

कर्क

ज्योतिषशास्त्रानुसार, कर्क राशीच्या लोकांसाठी ही युती विशेषतः फायदेशीर ठरेल. तुमची आंतरिक समज आणि विचार करण्याची शक्ती पूर्वीपेक्षा चांगली होईल, ज्यामुळे जीवनातील गुंतागुंतीच्या बाबी समजून घेणे सोपे होईल. कुटुंब आणि घरातील बाबींमध्ये सकारात्मक बदल होतील. गुंतवणुकीसाठी आणि पैशाच्या आवकसाठी नवीन संधी निर्माण होतील. तसेच, दीर्घकाळ प्रलंबित असलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता वाढेल. तुमचा आत्मविश्वास आणखी मजबूत होईल.

धनु

ज्योतिषशास्त्रानुसार, धनु राशीसाठी, सिंह राशीतील बुध-केतूची युती खूप शुभ संकेत घेऊन येईल. यावेळी तुमचे नशीब चमकू शकते. ते नियोजन आणि अंमलबजावणी करण्याची तुमची क्षमता वाढेल. तुम्हाला प्रवास, शिक्षण आणि परदेशाशी संबंधित बाबींमध्ये यश मिळेल. तुम्ही परदेश दौऱ्यावर जाऊ शकता. नवीन व्यवसाय करार आणि भागीदारीमुळे फायदा होईल. आर्थिक समृद्धीसोबतच सामाजिक प्रतिष्ठाही वाढेल. हा काळ तुमच्यासाठी अनेक नवीन कामगिरी घेऊन येईल.

हेही वाचा :                          

Grahan Yog 2025: 18 जूनपर्यंत मोठा धक्का बसणार, राहू-चंद्राचा धोकादायक योग, 5 राशींचा कठीण काळ सुरू, पुन्हा दुर्घटना? काळजी घ्या...

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)