Budh Gochar 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांच्या चालीला विशेष महत्त्व आहे. जेव्हा ग्रह आपली स्थिती बदलतात तेव्हा त्याचा परिणाम आपल्या करिअर, व्यवसाय आणि आर्थिक जीवनावर होतो. बुध ग्रह (Budh Gochar)दक्षिण मार्गाच्या दिशेने म्हणजेच 25 मार्च 2026 रोजी संक्रमण करणार आहे. पंचांगानुसार, बुध ग्रहाच्या या दशा परिवर्तनाने मानवी जीवनावर फार महत्त्वाचे बदल पाहायला मिळतील.
बुध ग्रहाला बुद्धी, वाणी आणि व्यवसायाचा कारक ग्रह मानतात. ज्योतिष शास्त्रानुसार, हा बदल काही राशींसाठी फार चांगला ठरणार आहे. या लकी राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचं परिवर्तन फार लकी ठरणार आहे. या काळात 25 मार्चनंतर तुमच्या कामात अधिक स्पष्टता दिसून येईल. तसेच, व्यवसायात चांगली प्रगती पाहायला मिळेल. जर तुमचं एखादं काम अनेक दिवसांपासून रखडलं असेल तर ते तुम्ही पूर्ण करु शकता. कामाच्या ठिकाणी तुम्ही घेतलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. त्यासाठी तुम्हाला इतरांवर अवलंबून राहावं लागणार नाही.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीचा स्वामी बुध ग्रह आहे. त्यामुळे या काळात तुमच्यावर सरळ आणि सकारात्मक परिणाम पाहायला मिळणार आहे. तुमचा आत्मविश्वास अधिक वाढलेला दिसेल. तसेच, बौद्धिक क्षमता तुमची चांगली दिसून येईल. उत्पन्नाच्या अनेक संधी तुम्हाला मिळतील. विद्यार्थ्यांचं अध्ययनात तसेच, धार्मिक कार्यात मन रमेल. तुमच्या कामात तुमची एकाग्रता वाढलेला दिसेल.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचं संक्रमण आर्थिकदृष्ट्या फलदायी ठरणार आहे. या कालावधीत तुम्ही ज्या योजना राबवाल त्यात तुम्हाला यश मिळेल. तुमच्या मार्गातील अडथळे दूर होतील. तसेच, पैशांशी संबंधित निर्णय तुम्ही फार विचारपूर्वक घ्याल. नवीन जबाबदाऱ्या काही तुमच्यावर सोपवण्यात येऊ शकतात. त्या तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडाल.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
