Budh Gochar 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, बुध (Budh Gochar)ग्रह शनिसह सध्या मीन राशीत स्थित आहे. बुध ग्रह एप्रिल महिन्याच्या शेवटी राशी परिवर्तन करणार आहे. बुध ग्रह मेष राशीत परिवर्तन केल्याने अनेक राशींचे चांगले योग येणार आहेत. तर, काही राशींना संकटाचा सामना करावा लागेल. 

Continues below advertisement

ज्योतिष शास्त्रानुसार, बुध ग्रह मे महिना सुरु व्हायच्या आधीच राशी परिवर्तन करणार आहे. तर, मे महिन्यात बुध अस्त होणार आहे, मंगळ राशीत येण्याने बुध ग्रहासाठी फार शुभ योग निर्माण होणार आहेत. 

मेष रास (Aries Horoscope)

बुध ग्रहाचं संक्रमण मेष राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरणार आहे. जी पण तुमची स्वप्नं आहेत ती या कालावधीत पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच, मंगळ ग्रहाचा प्रभावही तुमच्यावर पाहायला मिळणार आहे. बुध ग्रहाच्या प्रभावाने तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास सक्षम असाल. तसेच, तुमच्या उत्पन्नातून तुम्हाला समाधान मिळेल. तसेच, तुम्ही महत्त्वाच्या कामांना तुम्ही आधी प्रोत्साहन द्याल. तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडतील. 

Continues below advertisement

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचं संक्रमण शुभकारक ठरणार आहे. या काळात नोकरदार वर्गातील लोकांना चांगल्या नोकरीची संधी मिळेल. तसेच, तुमच्या उत्पन्नातून तुम्हाला दुप्पट लाभ मिळेल. मुलांच्या कलागुणांना देखील चांगला वाव मिळेल. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढेल. छान प्रवासाचे योग जुळून येणार आहेत. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ महत्त्वाचा ठरणार आहे. या काळात नोकरीत तुम्हाला प्रमोशनची संधी मिळेल. तसेच, शनिच्या ढैय्याचा तुम्हाला चांगला लाभ मिळेल. या कालावधीत शिस्तप्रिय राहून तुम्हाला काम करावं लागेल. या काळात घरात वाद कमी होतील. लाईफ पार्टनरबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवू शकाल. 

हे ही वाचा :                                                                            

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Shani Sade Sati : कुंभ राशीची 2027 ला संपणार शनि साडेसाती.. मेष आणि मीन राशींवर अजूनही सावट, कधी होणार साडेसातीपासून सुटका?