Budh Gochar 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, बुध ग्रहाला ग्रहांचा राजकुमार मानलं जातं. बुध ग्रह दर 15 दिवसांनी राशी परिवर्तन करतो. तसेच, या व्यतिरिक्त तो नक्षत्र परिवर्तनही करतो. याचा परिणाम सर्व 12 राशींवर चांगल्या किंवा वाईट पद्धतीने होतो. बुध ग्रहाला व्यवसाय, शिक्षण, बुद्धी, बौद्धिक क्षमता आणि तर्क-वितर्काचा कारक ग्रह मानतात. त्यामुळे या क्षेत्रांवरही त्याचा परिणाम दिसून येतो.
सध्या बुध ग्रह मीन राशीत उत्तरा भाद्रपद नक्षत्रात विराजमान आहे. तर, 22 एप्रिल रोजी बुध ग्रह स्वत: रेवती नक्षत्रात प्रवेश करणार आहे. त्यामुळे काही राशींना चांगला लाभ मिळणार आहे.
द्रिक पंचांगानुसार, बुध ग्रह 22 एप्रिल 2026 रोजी बुधवारी 1 वाजून 41 मिनिटांनी रेवती नक्षत्रात प्रवेश करणार आहे. तर, 30 एप्रिल रोजी सकाळी 6.55 वाजता नक्षत्र परिवर्तन करुन अश्विनी नक्षत्रात प्रवेश करेल.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचं रेवती नक्षत्रात होणारं संक्रमण अनेक दृष्टीने लाभदायी ठरणार आहे. या राशीच्या अकराव्या चरणात बुध ग्रह विराजमान आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून तुमच्या मनात राहिलेली इच्छा पूर्ण होईल. उत्पन्नात चांगली वाढ होईल. तसेच, मित्रांचं तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. तुमचं ध्येय तुम्ही गाठू शकाल.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीसाठी हा काळ फार अनुकूल असणार आहे. या राशीच्या कुंडलीतील भाग्याच्या स्थानी बुध ग्रहाचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे या कालावधीत तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. नवीन संपर्क वाढतील. तसेच, नेटवर्किंगच्या माध्यमातून तुम्ही चांगली ओळख निर्माण कराल. या कालावधीत तुमचं परदेशात जाण्याचं स्वप्न पूर्ण होईल. तसेच, उच्च शिक्षणाचा लाभ तुम्हाला घेता येईल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
बुध ग्रहाचं रेवती नक्षत्रात जाण्याने कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ फलदायी असेल. या काळात अनेक दिवसांपासून तुमची रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. घरातील वाद मिटतील. तसेच, तुमच्या घरातील वातावरण आनंदी असेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला सहकाऱ्यांचा चांगला सपोर्ट मिळेल. मात्र, या कालावधीत तुम्हाला अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
