Budh Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, बुध ग्रहाला (Budh Gochar) संचार, बुद्धी, विचार आणि व्यवसायाचा कारक ग्रह मानतात. बुध ग्रह ठराविक वेळेनंतर आपली चाल बदलतात. ज्योतिष शास्त्रानुसार, बुध ग्रह 30 ऑगस्ट 2025 रोजी सिंह राशीत प्रवेश करणार आहे. 

ज्योतिष शास्त्रानुसार, बुध ग्रहाच्या राशी परिवर्तनाचा परिणाम देशभरात तसेच, सर्व 12 राशींवर होणार आहे. त्यामुळे बुध ग्रहाच्या संक्रमणाने कोणत्या राशींना लाभ मिळणार आहे ते जाणून घेऊयात. 

मेष रास (Aries Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचं हे संक्रमण फार अनुकूल ठरणार आहे. या दरम्यान तुम्हाला तुमच्या प्रत्येक कार्यात यश मिळेल. तसेच, तुमच्या धनसंपत्तीत चांगली वाढ झालेली दिसेल. तुमच्या विचारांत स्पष्टता दिसून येईल. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या लोकांवर बुध ग्रहाचं संक्रमण फार प्रभावी ठरणार आहे. या काळात तुमच्या विचारांत, भाषेत आणि राहणीमानात बदल दिसून येईल. तुमच्या विचारांत ताळमेळ दिसून येईल. तसेच, तुमच्या कारभाराचा विस्तार झालेला दिसेल. 

कर्क रास (Cancer Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचं हे संक्रमण फार अनुकूल ठरणार आहे. या काळात तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा झालेली दिसेल. तसेच, तुमच्या जीवनात आनंद येईल. तुमचं वैवाहिक जीवन फार सुखी असेल.तुमची मानसिक शांती दूर राहील. 

सिंह रास (Leo Horoscope)

ज्योतिष शास्त्रानुसार, बुध ग्रह आपल्या सूर्याच्या राशीत म्हणजेच सिंह राशीत प्रवेश करणार आहे. बुध ग्रह बुद्धीमत्ता, अभिव्यक्ती आणि नेतृत्वक्षमता वाढवणारा आहे. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल. 

धनु रास (Saggitarius Horoscope)

बुध ग्रहाचं हे राशी परिवर्तन धनु राशीच्या लोकांसाठी फार शुभकारक आणि लाभदायक ठरणार आहे. या काळात तुमच्या धनसंपत्तीत चांगली भरभराट झालेली दिसेल. तसेच, देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा राहील. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :                                                                                

Ganesh Chaturthi 2025 : यंदाच्या गणेश चतुर्थीला बाप्पाला दाखवा 'या' पदार्थांचा नैवेद्य; जाणून घ्या गणरायाचे आवडते 5 पदार्थ