Budh Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, दिवाळीच्या (Diwali 2025) उत्सवानंतर म्हणजेच 24 ऑक्टोबर 2025 रोजी ग्रहांचा राजकुमार बुध (Budh Gochar) ग्रह वृश्चिक राशीत संक्रमण करणार आहे. वृश्चिक राशीत बुध ग्रहाच्या आगमनाने अनेक राशींचे चांगले दिवस सुरु होणार आहेत. त्यामुळे या लकी राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
मंगळ ग्रहाच्या राशीत बुधाची एन्ट्री
येत्या 24 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 12 वाजून 39 मिनिटांनी बुध ग्रह वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, बुध ग्रहाला बुद्धी, वार्ता, व्यवहार आणि अभ्यासाचा कारक ग्रह मानतात. वृश्चिक रास ही मंगळ ग्रहाची रास आहे. गंभीर विचार, रहस्य आणि बदलाचं प्रतीक मानलं जातं. या ग्रहाच्या संक्रमणाने बुध ग्रहाची ऊर्जा अधिक प्रभावी होईल. त्यामुळे कोणत्या राशींसाठी हा काळ चांगला असेल ते जाणून घेऊयात.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचं संक्रमण फार प्रभावी ठरणार आहे. या काळात तुमचं संवादकौशल्य चांगलं दिसून येईल. तसेच, तुम्ही नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची सुरुवात करु शकता. जर तुम्ही पैशांची गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी हा काळ चांगला असणार आहे.
धनु रास (Saggitarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांच्या दुसऱ्या चरणात बुध ग्रहाचं संक्रमण होणार आहे. या काळात तुमचा आर्थिकदृष्ट्या दृष्टीकोन स्पष्ट राहील. कुटुंबियांबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवाल. तसेच, तुम्ही केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला लाभ होऊ शकतो. तुमच्या व्यवसायाचा विस्तार देखील वाढलेला दिसेल.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर रासीच्या तिसर्या चरणात हे संक्रमण होणार आहे. जो हिंमत, संवादाचं प्रतीक आहे. यामुळे तुमचं नेटवर्किंग चांगलं राहील. तसेच, छोट्या छोट्या ट्रिप्समधून तुम्हाला समाधान मिळेल. तुमच्यातील क्रिएटिव्ह कल्पना दिसून येतील.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीसाठी बुध ग्रह चौथ्या चरणात आहे. यामुळे तुमच्या भौतिक सुख-संपत्तीत वाढ झालेली दिसेल. पैशांशी संबंधित तुम्हाला चांगला लाभ मिळेल. देवी लक्ष्मीची तुमच्यावर सदैव कृपा राहील. तसेच, मानसिकदृष्ट्या तुम्हाला शांती मिळेल.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या पाचव्या चरणात हे संक्रमण होणार आहे . या काळात तुमची लव्ह लाईफ चांगली राहील. तसेच, मुलांच्या कलागुणांना चांगला न्याय मिळेल. या काळात तुम्ही क्रिएटिव्ह गोष्टी कराल. आरोग्याची काळजी घ्यावी लागणार नाही.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :