Bhaubij 2025 Lucky Zodiac Signs: भाऊबीज पासून 'या' 3 राशींच्या भावडांचं नशीब आरारा.. खतरनाक! बुधादित्य योगामुळे मोठ्या लॉटरीचे संकेत, तुमची रास?
Bhaubij 2025 Lucky Zodiac Signs: ज्योतिषशास्त्रानुसार, भाऊबीजच्या दिवशी एक दुर्मिळ ग्रहसंयोजन या 3 राशींच्या भावडांना सौभाग्य देईल! अचानक धनप्राप्ती होण्याचे संकेत आहेत.

Bhaubij 2025 Lucky Zodiac Signs: आज दिवाळी पाडवा...बलिप्रतिपदा (Balipratipada 2025) आहे. तर भाऊबीज (Bhaubij 2025) हा दिवाळीतील (Diwali 2025) शेवटचा दिवस आहे. या सणाला यम द्वितीय असेही म्हणतात. हा सण भाऊ-बहिणींमधील अतूट प्रेमाचे प्रतीक आहे. भाऊबीजच्या दिवशी बहिणी भावांना ओवाळतात, त्यांना टिळा लावतात, त्यांच्या प्रगती, सुखासाठी कामना करतात. ज्योतिषशास्त्रानुसार, भाऊबीजच्या दिवशी काही राशींना सौभाग्य मिळण्याची शक्यता आहे. कारण या दिवशी ग्रह-नक्षत्रांचे दुर्मिळ संयोजन होतंय. त्यांना आर्थिक लाभ, सन्मान आणि इच्छित परिणाम मिळू शकतात. भाऊबीजच्या या भाग्यवान राशींबद्दल जाणून घेऊया.
भाऊबीजेला बनतोय ग्रहांचा दुर्मिळ योग...( Bhaubij 2025 Lucky Zodiac Signs)
भाऊबीजेच्या दिवशी सर्व बहिणी आपल्या भावांच्या दीर्घायुष्यासाठी आणि आनंदी आयुष्यासाठी प्रार्थना करताना करतात. भाऊ आपल्या बहिणींना भेटवस्तू देतात. या वर्षी, उद्या, 23 ऑक्टोबर रोजी भाऊबीज साजरा केली जाईल. या दिवशी, विशाखा नक्षत्र आणि आयुष्मान योगाचे संयोजन होत आहे. ज्योतिषशास्त्रात हा योग खूप शुभ मानला जातो. भाऊबीजच्या दिवशी सूर्य आणि बुध तूळ राशीत असतील, ज्यामुळे बुधादित्य योग निर्माण होईल.
'या' 3 राशींना फायदा होईल
ज्योतिषशास्त्रानुसार, भाऊबीजेच्या दिवशी, चंद्र आणि गुरू कर्क राशीत भ्रमण करतील. या दुर्मिळ ग्रहांच्या युतीमुळे भाऊबीजच्या दिवशी काही राशींना सौभाग्य मिळू शकते. त्यांना आर्थिक लाभ, सन्मान आणि इच्छित परिणाम मिळू शकतात. चला या भाग्यवान राशींबद्दल जाणून घेऊया.
सिंह (Leo)
ज्योतिषशास्त्रानुसार, सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभ असू शकतो. त्यांना मालमत्तेत गुंतवणूक करण्याची संधी मिळू शकते, ज्यामुळे आर्थिक लाभ होऊ शकतो. जुन्या कामाशी संबंधित ताण कमी होऊ शकतो. आरोग्य सुधारू शकते.
तूळ (Libra)
ज्योतिषशास्त्रानुसार, या काळात तूळ राशीला आर्थिक लाभ होऊ शकतो. कर्जाच्या समस्या दूर होऊ शकतात. लग्नाच्या मार्गात येणाऱ्या अडचणी दूर होऊ शकतात. आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व सुधारू शकते.
वृश्चिक (Scorpio)
ज्योतिषशास्त्रानुसार, वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ बदलांनी भरलेला असू शकतो. त्यांना कलात्मक क्षेत्रात प्रगती करण्याची संधी मिळू शकते. त्यांची व्यावसायिक प्रतिमा सुधारू शकते आणि मजबूत होऊ शकते. त्यांना व्यवसायातील लोकांकडून पाठिंबा मिळू शकतो.
हेही वाचा>>
Shani Dev: हुश्श.. 'या' राशी शनिच्या ढैय्यातून सुटल्या बुवा..! पुढचे 3 महिने कसे बदल होणार? भविष्य उज्ज्वल, शुभ संधीचा काळ,
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















