Bhadrapada Month 2025 : भाद्रपद महिना 'या' राशींसाठी ठरणार गेमचेंजर; बाप्पाच्या कृपेने पदरात पडणार फक्त पुण्य, संकटांचा होणार विनाश
Bhadrapada Month 2025 : सणवाराच्या दृष्टीने भाद्रपद महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. कारण या महिन्यात आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे.

Bhadrapada Month 2025 : हिंदू पंचांगानुसार, श्रावण (Shravan) महिना संपून उद्यापासून भाद्रपद (Bhadrapada) महिन्याला सुरुवात होणार आहे. या महिन्यात हरतालिका तृतीया, गणेश चतुर्थी, गौरी आवाहन, आणि ऋषिपंचमी यांसारखे अनेक महत्त्वाचे सण साजरे केले जातात. त्यामुळे सणवाराच्या दृष्टीने हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. कारण या महिन्यात आपल्या लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे. पण, भाद्रपद महिना कोणत्या राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे तुम्हाला माहित आहे का? नसेल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीसाठी भाद्रपद महिना भाग्याचा ठरणार आहे. या महिन्यात तुम्ही हाती घेतलेल्या कार्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल. तसेच, तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच, वैवाहिक जीवनात सुख शांती टिकून राहील. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची जास्त संधी मिळेल.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी भाद्रपद महिना खास असणार आहे. या महिन्यात तुम्हाला नवनवीन सरप्राईज मिळतील. तसेच, या कालावधीत तुम्ही केलेल्या गुंतवणुकीतून तुम्हाला लाभ मिळेल. जोडीदाराबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवू शकाल. तसेच, जर तुम्हाला नवीन घर किंवा वाहन खरेदी करायचं असेल तर हा काळ त्यासाठी उत्तम आहे.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांना भाद्रपद महिन्यात चांगले लाभ मिळतील. या काळात तुम्ही ठरवलेली कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. बाप्पाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असेल. शिक्षणात मुलांची चांगली प्रगती दिसून येईल. तसेच, तुमच्या व्यवसायासाठी हा काळ फार शुभ आणि महत्त्वाचा असणार आहे.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीसाठी भाद्रपद महिना फार लकी असणार आहे. या महिन्यात गणपती बाप्पाचं आगमन होत असल्या कारणाने अनेक शुभ कार्यात तुम्हाला सहभागी होण्याची संधी मिळेल. तसेच, उत्पन्नाचे वारे वाहतील. धार्मिक कार्यात तुमची आवड निर्माण होईल. या कालावधी तुम्ही नवीन घर किंवा प्रॉपर्टी देखील विकत घेऊ शकता. नवीन व्यवसाय सुरु करण्याची चांगली संधी आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Shani Amavasya 2025 : अवघ्या काही तासांतच सुरु होतोय भयंकर 'षडाष्टक योग'; शनि अमावस्येला 'या' 3 राशींवर घोंगावणार संकटाचं वादळ



















