Baba Venga Prediction 2026 : बाबा वेंगाची चक्रावणारी भविष्यवाणी! पुढचे 7 दिवस 5 राशींना मिळणार शुभ संकेत; ग्रहांचा पॉवरफुल शुभ योग, घरात येणार पैसाच पैसा
Baba Venga Prediction 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, 12 ते 18 ऑक्टोबर असा या महिन्याचा दुसरा आठवडा असणार आहे. या आठवड्यात अनेक शुभ योग निर्माण होणार आहे.

Baba Venga Prediction 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, बाबा वेंगाने (Baba Venga) दिलेल्या भविष्याबाबत देशभरात उत्सुकता निर्माण होते. याचं कारण म्हणजे बाबा वेंगा यांना भविष्यात घडणाऱ्या घटनांचा आधीच अंदाज लावता येतो. त्यानुसार, आता ऑक्टोबर (October 2026) महिन्याचा दुसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, 12 ते 18 ऑक्टोबर असा या महिन्याचा दुसरा आठवडा असणार आहे. या आठवड्यात अनेक शुभ योग (Yog) निर्माण होणार आहे. मात्र, बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार, कोणत्या 5 राशींसाठी (Zodiac Signs) हा आठवडा भाग्यशाली ठरणार आहे ते जाणून घेऊयात.
मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)
या आठवड्यात तुमच्या संवादकौशल्याचा फायदा होऊ शकतो. नोकरीत नवीन जबाबदारी किंवा व्यवसायात महत्त्वाची संधी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत योग्य नियोजन केल्यास फायदा होऊ शकतो.
सिंह रास (Leo Weekly Horoscope)
तुमची रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी हा आठवडा अनुकूल ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या नेतृत्वगुणांची दखल घेतली जाऊ शकते. व्यवसाय विस्तारासाठी नवीन कल्पना सुचतील आणि कौटुंबिक वातावरण आनंदी राहण्याची शक्यता आहे.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात समतोल राखण्याची संधी मिळेल. भागीदारीतून नवीन कामे मिळू शकतात. प्रेमसंबंधांत संवाद वाढल्याने गैरसमज दूर होण्यास मदत होईल. खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे ठरेल.
धनु रास (Saggitarius Weekly Horoscope)
तुम्हाला एखादी नवीन गोष्ट शिकण्यासाठी आणि करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी हा आठवडा प्रेरणादायी ठरू शकतो. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवीन संधी मिळू शकतात. महत्त्वाच्या व्यक्तींशी संपर्क वाढेल; मात्र कोणताही निर्णय घेताना घाईगडबड करु नका. नीट विचार करुन निर्णय घ्या.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभकारक असणार आहे. तुमच्या सर्जनशील कल्पनांना योग्य दिशा मिळू शकते. सहकाऱ्यांच्या मदतीने एखादे महत्त्वाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत उत्पन्न वाढवण्याच्या नवीन मार्गांचा विचार करता येईल. नातेसंबंधांत स्पष्ट संवाद ठेवा.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Horoscope Today 10 October 2026 : आज शनिवारच्या दिवशी 'या' 6 राशींवर असणार शनिची करडी नजर, कर्माचं फळ कोणाला मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य



















