Baba Venga Prediction 2025: भारतासह जगभरात ढगफुटी, भूस्खलन, पूर, वादळ.. गेल्या काही दिवसांत घडणाऱ्या या घटनांकडे पाहता आता खरोखरचं विनाशाची चाहूल लागलीय का? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. बाबा वेंगा यांच्या एका भविष्यवाणीनुसार, 2025 मध्ये मोठ्या आपत्ती किंवा विनाशाच्या सुरुवातीचे संकेत येऊ लागली आहेत. जाणून घेऊया काय होती भविष्यवाणी? ज्यामुळे अनेकांना घाम फुटला आहे.

अनेक दशकांपूर्वी करण्यात आली भाकिते 

काश्मीरचे किश्तवार असो किंवा उत्तराखंडचे धराली असो, गेल्या आठवड्यात दिसलेल्या अशा काही मोठ्या घटना घडल्या की पाहणाऱ्यांना वाटले की आता जणू सर्व काही संपणार आहे. 2025 या वर्षात युद्ध, हिंसाचार, आपत्ती आणि प्रचंड राजकीय उलथापालथ देखील झाली आहे. ज्यामुळे मोठा विनाश सुरू होणार की काय, असा अंदाज लावला जात आहे. जगभरातील विविध ज्योतिषींनी सांगितल्याप्रमाणे 2025 ची काही भाकिते खरी ठरत आहेत. तर काही भाकिते अनेक दशकांपूर्वी करण्यात आली होती. यामध्ये प्रसिद्ध भविष्यवक्ता बाबा वेंगा यांची भविष्यवाणी समाविष्ट आहे.

जगाचा अंत 2025 मध्ये सुरू होणार?

जगाचा अंत कधी होणार? विनाशाला सुरूवात कधी होणार? हे असे प्रश्न आहेत, जे इंटरनेटवर अनेकदा विचारले जातात आणि त्याबाबत माहिती शोधली देखील जाते. काही अहवालांनुसार, बाबा वेंगा यांनी असा दावा केला होता की, जगाचा अंत 2025 मध्ये सुरू होईल. हा विनाश संघर्ष, युद्ध आणि नैसर्गिक आपत्तींनी सुरू होईल. युरोपमध्ये एक विनाशकारी युद्ध होईल, ज्यामुळे या खंडातील मोठ्या लोकसंख्येचा नाश होईल.

ही तीच नैसर्गिक आपत्ती आहे का?

बाबा वेंगा यांच्या भाकितानुसार, 2025 मध्ये विनाशकारी नैसर्गिक आपत्ती येतील. या आपत्तींमुळे अनेक देशांचे नुकसान होईल. यामध्ये महापूर, आग, ढगफुटी, ज्वालामुखीचा उद्रेक यासारख्या भयानक घटनांचा समावेश असेल. हे इतके भयानक असेल, की जणू काही मोठा विनाश सुरू झाला आहे.

मोठ्या प्रमाणात जीवितहानी?

बाबा वेंगा यांच्या भाकितानुसार, या नैसर्गिक आपत्तींमुळे मोठ्या प्रमाणात विनाश आणि जीवितहानी होईल. या घटनांमुळे मोठ्या प्रमाणात विस्थापन देखील होईल. हवामान बदल, हिमनद्या वितळणे, जंगलातील आगीमुळे जगाचे मोठे नुकसान होईल. बाबा वेंगा यांच्या भाकितानुसार, जग 5079 मध्ये त्याच्या अंतापर्यंत पोहोचेल.

हेही वाचा :           

Weekly Lucky Zodiac Signs 18 to 24 August 2025: पुढचे 7 दिवस 'या' 5 राशींचे भाग्य घेऊन आलेत! जबरदस्त कला राजयोग बनतोय, नोकरीत प्रमोशन, उत्पन्नाचे नवे साधन..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)