Baba Vanga Prediction : ज्योतिष शास्त्रानुसार, बाबा वेंगाने (Baba Venga) दिलेल्या भविष्याबाबत देशभरात उत्सुकता निर्माण होते. याचं कारण म्हणजे बाबा वेंगा यांना भविष्यात घडणाऱ्या घटनांचा आधीच अंदाज लावता येतो. त्यानुसार, लवकरच सप्टेंबर महिन्याचा (September 2026) दुसरा आठवडा सुरु होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, 7 ते 13 सप्टेंबर असा सप्टेंबर महिन्याचा दुसरा आठवडा असणार आहे. या आठवड्यात अनेक शुभ योग (Yog)निर्माण होणार आहेत. मात्र, बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार, कोणत्या 5 राशींसाठी सप्टेंबरचा दुसरा आठवडा भाग्यशाली ठरणार आहे ते जाणून घेऊयात. 

Continues below advertisement

वृषभ रास (Taurus Horoscope)

7 ते 13 सप्टेंबरचा आठवडा वृषभ राशीसाठी आर्थिकदृष्ट्या चांगला ठरण्याची शक्यता आहे. या काळात उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण होण्याची शक्यता असून तुमची रखडलेली आर्थिक कामे मार्गी लागू शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांना वरिष्ठांकडून कौतुक किंवा महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते. व्यवसायात नवीन ग्राहक किंवा फायदेशीर संधी मिळण्याचे संकेत आहेत. प्रेमसंबंधात सकारात्मक बदल होतील आणि जोडीदाराकडून चांगली साथ मिळेल. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आत्मविश्वास आणि यश घेऊन येणारा ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या निर्णयक्षमतेची दखल घेतली जाण्याची शक्यता आहे.नवीन प्रोजेक्ट किंवा महत्त्वाची कामे तुमच्या हाती येऊ शकतात. आर्थिक स्थिती सुधारण्याबरोबरच अचानक एखादा लाभ मिळण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधात जवळीक वाढेल आणि अविवाहित लोकांसाठी नवीन लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळेल.  

Continues below advertisement

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी 7 ते 13 सप्टेंबरदरम्यान परिस्थिती अनुकूल होण्याचे संकेत आहेत. या कालावधीत तुमचं दीर्घकाळापासून अडकलेले एखादे काम पूर्ण होऊ शकते. ते पूर्ण झाल्यास तुम्हाला समाधान मिळेल. करिअरमध्ये बदल किंवा नवीन संधीचा विचार करणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. पैशांशी संबंधित निर्णय फायदेशीर ठरू शकतात; मात्र घाईघाईने गुंतवणूक करणे टाळावे. जोडीदारासोबतचे गैरसमज दूर होऊन नात्यात पुन्हा गोडवा निर्माण होण्याची शक्यता आहे. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांना या आठवड्यात मेहनतीचे चांगले फळ मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत पद, जबाबदारी किंवा पगारवाढीसंदर्भात सकारात्मक संकेत मिळू शकतात. व्यावसायिकांसाठी नवीन करार, पार्टनरशिप किंवा महत्त्वाची डील फायदेशीर ठरू शकते. आर्थिक बाबतीत स्थैर्य वाढेल आणि भविष्यासाठी बचतीचे नियोजन करता येईल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील आणि जवळच्या व्यक्तीकडून महत्त्वाची मदत मिळू शकते. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा नवीन संधी आणि सकारात्मक बदल घेऊन येऊ शकतो. करिअरमध्ये अचानक एखादी चांगली ऑफर किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन संपर्कांचा फायदा होऊ शकतो आणि आर्थिक व्यवहार वाढू शकतात. प्रेमजीवनात संवाद वाढल्यामुळे नात्यातील तणाव कमी होऊ शकतो. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :                                                                                                        

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींचा भाग्योदय सुरु; सप्टेंबरचा दुसरा आठवडा गेम पालटणार, वाचा साप्ताहिक राशीभविष्य