एक्स्प्लोर

Baba Vanga Prediction: बाबा वेंगाची जुलैच्या शेवटच्या टप्प्यातली भविष्यवाणी व्हायरल! 5 राशींना श्रीमंतीचे योग; भाग्योदयाची हीच वेळ, काऊंटडाऊन सुरू, तुमची रास?

Baba Vanga Prediction: आजपासून 13 ते 19 जुलै असा जुलै महिन्याचा नवा आठवडा सुरू झाला आहे. बाबा वेंगाच्या व्हायरल भाकितानुसार, या आठवड्यात काही राशी भाग्यशाली ठरणार आहे

Baba Vanga Prediction: बाबा वेंगा....ज्यांची भाकितं संपूर्ण जगात चर्चेचा विषय ठरतात.  त्यांच्या भविष्यवाणीमुळे अनेकदा सर्वांच्या भुवया उंचावतात. आपल्या कथित भाकितांसाठी जगभरात ओळखल्या जाणाऱ्या बाबा वेंगा नेहमीच कुतूहलाचा विषय राहिल्या आहेत. आजपासून जुलैचा 13 ते 19 जुलै 2026 हा नवा आठवडा सुरू झाला आहे. या आठवड्याबाबत बाबा वेंगांचं एक महत्त्वाचं भाकित सध्या व्हायरल होत आहे, ज्यात त्यांनी म्हटलंय की, काही विशिष्ट राशींना या महिन्यात ग्रह-तारे आणि शुभ योगांचा विशेष आशीर्वाद लाभेल. बाबा वेंगा यांच्या जुलैच्या शेवटच्या टप्प्यातल्या भविष्यवाणीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. हा महिना अनेक राशींच्या लोकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. या काळात या राशींना जॅकपॉट लागू शकतो. त्या भाग्यवान राशी कोणत्या आहेत?

बाबा वेंगाच्या भाकि‍तावर अनेकांचा गाढ विश्वास...(Baba Vanga Prediction)

बाबा वेंगाच्या भविष्यकथनाच्या सत्यतेची कोणतीही वैज्ञानिक पुष्टी नसली तरी, अनेक लोकांचा त्यावर गाढ विश्वास आहे. अशा समजुतींनुसार, आजपासून सुरू झालेला आठवडा, 13 ते 19 जुलै, हा पाच राशींच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात सकारात्मक बदल दर्शवितो. या राशींना आर्थिक लाभाच्या अनेक संधी मिळतील, तसेच त्यांच्या नोकरी-व्यवसायात चांगला नफा होण्याची शक्यता आहे. शिवाय, तुमच्या समस्या हळूहळू कमी होतील. बाबा वेंगा यांच्या जुलैच्या नव्या आठवड्याच्या भविष्यवाणीनुसार कोणत्या राशींना लक्षणीय फायदा होण्याची शक्यता आहे...

मेष (Aries)

बाबा वेंगा यांच्या भाकितानुसार, जुलै महिन्याचा शेवटचा काळ मेष राशीसाठी नवीन संधी घेऊन येऊ शकतो. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे, घर किंवा वाहन खरेदी करण्याचीही शक्यता आहे. या राशीच्या नोकरदार व्यक्तींना कामाच्या ठिकाणी त्यांच्या वरिष्ठांकडून पाठिंबा मिळू शकतो, ज्यामुळे त्यांना नवीन प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळेल. व्यावसायिकांनाही नवीन संधी मिळू शकतात. कौटुंबिक जीवन सुखी राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध पूर्वीपेक्षा अधिक सौहार्दपूर्ण होऊ शकतात.

कर्क (Cancer)

बाबा वेंगा यांच्या भाकितानुसार, जुलै महिन्याचा शेवटचा काळ कर्क राशीच्या लोकांसाठी आत्मविश्वास आणि यश घेऊन येऊ शकतो. या काळात, कर्क राशीच्या लोकांना त्यांच्या कामातील मेहनतीबद्दल प्रशंसा मिळू शकते आणि नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. या आठवड्यात, त्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची चिन्हे आहेत, ज्यामुळे ते त्यांची सर्व कर्जे फेडू शकतील. कर्क राशीच्या लोकांना कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल आणि नात्यांमधील दुरावा देखील कमी होऊ शकतो. आरोग्यही सामान्य राहण्याची शक्यता आहे आणि जुन्या गुंतवणुकीतून चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.

सिंह (Leo)

बाबा वेंगा यांच्या भाकितानुसार, जुलै महिन्याचा शेवटचा काळ सिंह राशीच्या लोकांसाठी करिअरमध्ये प्रगतीच्या संधी घेऊन येऊ शकतो. या राशीत जन्मलेले जे लोक बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना या आठवड्यात चांगली बातमी मिळू शकते. कौटुंबिक सुख नांदेल आणि तुम्हाला प्रत्येक पावलावर तुमच्या पालकांकडून पाठिंबा मिळेल. तुमचा सामाजिक दर्जा वाढेल आणि तुमची अनेक प्रतिष्ठित लोकांशी ओळख होईल. वैवाहिक जीवनाच्या बाबतीत, तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते अधिक घट्ट होईल आणि तुम्ही एकत्र मालमत्ता खरेदी देखील करू शकता. या आठवड्यात सिंह राशीच्या लोकांना भाग्याची साथ मिळेल आणि त्यांची अनेक नियोजित कामे सहजपणे पूर्ण होतील.

वृश्चिक (Scorpio)

बाबा वेंगा यांच्या भाकितानुसार, जुलै महिन्याचा शेवटचा काळ वृश्चिक राशीच्या लोकांसाठी अनेक बाबतीत फायदेशीर मानला जातो. या आठवड्यात बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात आणि गुंतवणुकीच्या बाबतीत सकारात्मक बातमी मिळू शकते. जर तुम्ही कायदेशीर बाबींमध्ये अडकले असाल, तर या आठवड्यात तुम्हाला दिलासा मिळू शकतो. तुमच्या प्रेम जीवनातील कोणत्याही चालू समस्या या आठवड्यात एका जवळच्या मित्राच्या मदतीने सुटतील आणि तुमचे नातेसंबंध पुन्हा रुळावर येतील. नोकरी करणारे लोक त्यांचे काम कोणत्याही अडचणीशिवाय पूर्ण करतील, तर व्यवसायाच्या विस्ताराच्या योजना यशस्वी होऊ शकतात.

मकर (Capricorn)

बाबा वेंगा यांच्या भाकितानुसार, जुलै महिन्याचा शेवटचा मकर राशीच्या लोकांना त्यांच्या करिअर आणि आर्थिक बाबींबद्दल चांगली बातमी मिळू शकते. या आठवड्यात मकर राशीच्या कुटुंबात एखादा धार्मिक कार्यक्रम होऊ शकतो. अविवाहित लोकांसाठीही एक चांगले नातेसंबंध निर्माण होऊ शकतात. पुढील आठवड्यात मकर राशीच्या व्यक्तींना त्यांच्या करिअर आणि आर्थिक बाबींबद्दल चांगली बातमी मिळू शकते. या राशीच्या व्यक्तींना पदोन्नती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नफ्याचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात आणि तुमची एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीशी भेटही होऊ शकते. तुमच्या वैयक्तिक आयुष्यातही सकारात्मक बदल दिसून येऊ शकतात.

हेही वाचा :

Guru Purnima 2026: गुरूपौर्णिमा येतेय..अनेक पॉवरफुल योगायोग बनतायत! 3 राशींच्या नशीबी राजयोगाचे संकेत, तिथी, महत्त्व, शुभ मुहूर्त जाणून घ्या..

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vastu Tips : वास्तूशास्त्रानुसार झोपताना कोणत्या दिशेला डोकं करुन झोपावं? आरोग्यासाठी कोणती दिशा चांगली? वाचा वास्तूशास्त्र
वास्तूशास्त्रानुसार झोपताना कोणत्या दिशेला डोकं करुन झोपावं? आरोग्यासाठी कोणती दिशा चांगली? वाचा वास्तूशास्त्र
Hindu Religion : भगवान शंकराचे 'हे' आहेत 8 सर्वात मोठे भक्त; भोलेनाथांनी दिलेलं चिरंजीवी होण्याचं वरदान
भगवान शंकराचे 'हे' आहेत 8 सर्वात मोठे भक्त; भोलेनाथांनी दिलेलं चिरंजीवी होण्याचं वरदान
Weekly Horoscope: सिंह, कन्या राशींना मेहनतीचे फळ अखेर मिळणार, ऑगस्टचा दुसरा आठवडा, उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता, साप्ताहिक राशीभविष्य
सिंह, कन्या राशींना मेहनतीचे फळ अखेर मिळणार, ऑगस्टचा दुसरा आठवडा, उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता, साप्ताहिक राशीभविष्य
Trigrahi Yog 2026 : त्रिग्रही योग झाला 'Active'...17 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या पदरात पडणार पुण्य, हातात खेळणार पैसा, नशिबाचे दार उघडणार
त्रिग्रही योग झाला 'Active'...17 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या पदरात पडणार पुण्य, हातात खेळणार पैसा, नशिबाचे दार उघडणार
Advertisement

व्हिडीओ

Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Embed widget