Continues below advertisement


August Grah Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ऑगस्ट (August) महिन्याला सुरुवात झाली आहे. या महिन्यात अनेक मोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. याचा परिणाम मानवी जीवनावर देखील होणार आहे. पंचांगानुसार, या महिन्यात बुध (Mercury) आणि शुक्र (Venus) ग्रहाच्या युतीने लक्ष्मी नारायण राजयोग आणि गुरु-शुक्राच्या युतीने गजलक्ष्मी राजयोग जुळून येणार आहे. तसेच, ग्रहांचा राजा सूर्य आपल्या स्वराशीत म्हणजेच सिंह राशीत प्रवेश करणार आहे. 31 ऑगस्ट रोजी बुध ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे. या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.


मकर रास (Capricorn Horoscope)


मकर राशीच्या लोकांसाठी हे ग्रहांचं संक्रमण फार लाभदायक ठरणार आहे. या काळात शुक्र ग्रहाची सप्तम दृष्टी असेल यामुळे कर्क राशीत लक्ष्मी नारायण राजयोगाचा लाभ मिळेल. या काळात वैवाहिक जीवन देखील चांगलं असेल. नोकरदार वर्गातील लोकांना नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुमच्या व्यवसायात देखील तुम्हाला पार्टनरची साथ मिळेल.


धनु रास (Saggitarius Horoscope)


धनु राशीच्या लोकांसाठी ग्रहांची मकर राशीत होणारी चाल फार शुभदायक मानली जाणार आहे. या काळात तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा झालेली दिसेल. तसेच, करिअरमध्ये उच्च अधिकाऱ्यांचा चांगला सपोर्ट मिळेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवण्यात येतील. तुम्ही नियोजित केलेली कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील. तसेच, समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. जोडीदाराबरोबर तुमचीही चांगली प्रगती होईल.


कर्क रास (Cancer Horoscope)


कर्क राशीसाठी तीन ग्रहांची हालचाल फार लाभदायक ठरणार आहे. या काळात लक्ष्मी नारायण राजयोग देखील जुळून येणार आहे. त्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झालेली दिसेल. तुमच्या वैयक्तिक जीवनात अनेक बदल झालेले तुम्हाला पाहायला मिळतील. तसेच, कामाच्या ठिकाणी तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. लोक तुमच्या कामाचा आदर्श घेतील.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :                                  


Numerology : लग्नसंस्था, नको गं बाई! लग्नाच्या नावानेच दूर पळतात 'या' जन्मतारखेचे लोक; कितीही मागे लागा, शेवटी आपलंच करतात खरं