August Born Zodiac Sign Personality : ऑगस्ट महिन्याला उद्यापासून सुरुवात होणार आहे. हा महिना एक प्रकारे पवित्र महिना मानला जातो. कारण श्रावण सध्या सुरुच आहे. त्याचबरोबर, अनेक सण समारंभ देखील या महिन्यात आहे. तसेच, काही शुभ ग्रहांचं संक्रण देखील याच महिन्यात होणार आहे. मात्र, ऑगस्ट महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव नेमका कसा असतो? ऑगस्ट (August)महिन्यात जन्मलेल्या लोकांचे व्यक्तिमत्व आणि स्वभाव मुख्यतः त्यांची जन्मतारीख आणि त्या तारखेला येणाऱ्या राशीनुसार ठरते. ऑगस्ट महिना सिंह (Leo) आणि कन्या (Virgo) या दोन राशींमध्ये विभागलेला असतो. यावरून त्यांच्या स्वभावावर वेगवेगळ्या ग्रहांचा प्रभाव दिसतो. या संदर्भात अधिक माहिती डॉ. भूषण ज्योतिर्विद यांनी दिली आहे. 

1) ज्यांचा जन्म 1 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट दरम्यान होतो — सिंह (Leo)

प्रभाव : सूर्य (Surya) — आत्मविश्वास, तेज, नेतृत्व

स्वभाव वैशिष्ट्ये :

खूप आत्मविश्वासी, आकर्षक व्यक्तिमत्वनेतृत्व गुण असतात, समोरून चालतातप्रसिद्धी, सन्मान, आणि लक्षवेधी असण्याची इच्छाकधी कधी अहंकारी किंवा जरा गर्विष्ठ होऊ शकतातमित्रांशी निष्ठावान पण स्वतःकडे लक्ष वेधून घेणारे

करिअरमध्ये यशस्वी क्षेत्र :

प्रशासन, राजकारण, चित्रपट, कला, नेतृत्वपद, उद्योजक

2) ज्यांचा जन्म 23 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान होतो — कन्या (Virgo)

ग्रहाचा प्रभाव: बुध (Budh) — बुध्दिमत्ता, तार्किक विचार, विश्लेषण

स्वभाव वैशिष्ट्ये :

व्यवस्थित, प्रामाणिक, आणि फारच परिश्रमीतपशीलावर लक्ष देणारे, फारच काटेकोरलाजाळू, पण अतिशय चतुर आणि बुद्धिमानइतरांच्या चुका दाखवणारे पण आपली जबाबदारी पूर्ण करणारेआरोग्य व स्वच्छतेबाबत जागरूक

करिअरमध्ये यशस्वी क्षेत्र :

वैद्यकीय क्षेत्र, शिक्षण, लेखन, विश्लेषण, आकडेवारी, अकाउंटिंग

विशेष वैशिष्ट्ये ऑगस्ट जन्मासाठी एकत्रित :

स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी मेहनत करणारेनात्यांमध्ये प्रामाणिक पण थोडे डॉमिनेटिंगलहान वयातच काहीतरी विशेष करण्याची इच्छाशब्दांमध्ये ताकद असते – हे लोक वक्तृत्वकला, लेखन किंवा बोलण्यात प्रभावी असतात.

डॉ. भूषण ज्योतिर्विद

हेही वाचा :                             

August 2025 Monthly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी ऑगस्टचा महिना कसा असणार? कोणावर असणार शंकराची कृपा? मासिक राशीभविष्य