August 2024 Monthly Horoscope : ऑगस्ट महिना सुरू होणार आहे. ऑगस्टमध्ये ग्रह-ताऱ्यांची स्थिती अतिशय विशेष मानली जाते. ज्योतिषीय गणनेनुसार, ऑगस्टमध्ये सूर्य, शुक्र आणि बुध या प्रमुख ग्रहांच्या राशीत बदल होणार असून, त्याचा प्रभाव सर्व 12 राशींवर दिसून येईल. अशात तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना (Monthly Horoscope) कसा राहील? जाणून घ्या


तूळ (Libra Monthly Horoscope August 2024)


तूळ राशीच्या लोकांना ऑगस्टमध्ये चांगले परिणाम मिळतील. 31 दिवस तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. काही महत्त्वाच्या कामात यश मिळेल. तुमच्या करिअरमध्ये तुमची चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे आणि हा महिना तुमच्या सध्याच्या नोकरीत बदलाचे संकेत देत आहे. तुम्हाला जास्त पगारासह चांगल्या पदावर नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. बेरोजगारांनाही रोजगार मिळण्याची शक्यता आहे.


वृश्चिक (Scorpio Monthly Horoscope August 2024)


ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला काही चढ-उतारांना सामोरं जावं लागेल. नोकरीतही चढ-उतार होऊ शकतात. कोणीतरी तुमच्या विरोधात कट रचू शकतं, ज्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. व्यावसायिकांसाठी हा महिना अनुकूल राहील. तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळेल. या काळात कोणीतरी तुमचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करेल, परंतु तुम्ही त्वरीत परिस्थितीतून बाहेर पडाल.


धनु (Sagittarius Monthly Horoscope August 2024)


धनु राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना खूप फायदेशीर असणार आहे. तथापि, काही प्रकरणांमध्ये तुम्ही सावध राहिलं पाहिजे. विवाहित लोकांसाठी हा महिना आनंदाने भरलेला असेल, कारण नातेसंबंध प्रेमाने भरलेले असतील. नोकरी करणारे लोक त्यांच्या कामात कमी रस घेतील, ज्यामुळे नोकरीमध्ये काही समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करावं लागेल. व्यावसायिकांसाठी हा महिना अनुकूल राहण्याची शक्यता आहे.


मकर (Capricorn Monthly Horoscope August 2024)


हवामानातील बदलामुळे तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. कौटुंबिक जीवनात काही चढ-उतार येऊ शकतात. प्रेम संबंध चांगले राहतील. तुमची संपत्ती वाढेल. बँक बॅलन्स पूर्वीपेक्षा वाढेल. उत्पन्नाचे नवे साधन मिळेल. करिअरबद्दल बोलायचं झाल्यास, तुम्हाला उच्च अधिकाऱ्यांचं सहकार्य मिळेल. नोकरीत पदोन्नतीसाठीही तुम्हाला सहकार्य मिळू शकतं.


कुंभ (Aquarius Monthly Horoscope August 2024)


नोकरी करणाऱ्यांना ऑगस्ट महिन्यात चांगलं यश मिळू शकतं. व्यवसाय करणाऱ्यांसाठी महिन्याचा शेवट चांगला राहील, या काळात तुम्हाला आर्थिक लाभ होईल. व्यवसायात विस्तार संभवतो. महिन्याच्या मध्यात तुमच्या व्यवसायाशी संबंधित खर्च वाढू शकतात. या महिन्यात तुमचा खर्च वाढू शकतो. त्यामुळे तुमच्या पैशाचा सुज्ञपणे वापर करणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. खर्च वाढल्यामुळे तुमची बचत कमी होऊ शकते. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल.


मीन (Pisces Monthly Horoscope August 2024)


ऑगस्टमध्ये तुम्ही तुमच्या आर्थिक स्थितीकडे आणि आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावं. तुम्हाला आर्थिक आणि शारीरिक समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. या महिन्यात तुमच्या खर्चातही वाढ होईल. तुमच्या करिअरबद्दल बोलायचं झालं तर, तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांचं सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुम्ही चांगली कामगिरी करण्यात यशस्वी व्हाल. कठोर परिश्रमाने व्यावसायिक आघाडीवर चांगले परिणाम मिळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा :


Monthly Horoscope August 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी ऑगस्ट महिना कसा राहील? मासिक राशीभविष्य जाणून घ्या